शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कृषीमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा

By admin | Updated: July 27, 2016 23:57 IST

विभागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मांडलेल्या लक्ष्यवेधीवर उत्तर देताना कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी दाखविलेल्या प्रचंड अनास्थेमुळे संतप्त होऊन ....

यशोमती ठाकूर आक्रमक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत दाखविली अनास्था अमरावती : विभागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मांडलेल्या लक्ष्यवेधीवर उत्तर देताना कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी दाखविलेल्या प्रचंड अनास्थेमुळे संतप्त होऊन आ. यशोमती ठाकून यांनी कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पावसाळी अधिवेशनात आ. यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर अमरावती विभागात पेरणीच्या वेळी बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याचा मुद्दा मांडला. मात्र, याबाबत उत्तर देताना कृषीमंत्री उदासिन होते. त्यांनी केवळ याबाबत माहिती मागविण्यात येईल, असे त्रोटक उत्तर दिले. यामुळे आ. यशोमती आक्रमक झाल्यात. शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा इतका गंभीर विषय मांडला जात असताना कृषीमंत्री अशी टोलवाटोलवीची उत्तरे कशी काय देऊ शकतात? असा संतप्त सवाल यशोमतींनी केला. आजवर शेतकरी हितासाठी आंदोलने करणारे आणि आपणच शेतकऱ्यांचे खरे तारणहार असल्याचे चित्र निर्माण करणारे सदाशिव खोत आता कृषीमंत्री पदी आरूढ आहेत. परंतु तरीही त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत कणव नाही. ‘अच्छे दिन’चा गाजावाजा करणाऱ्या या बेजबाबदार मंत्र्यांना शेतकरी मरणासन्न अवस्थेत असताना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे खोत यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आ. यशोमतींनी केली. जिल्ह्यात पेरणीच्या वेळी नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन व इतर पिकांच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. पेरणी आटोपल्यानंतर शासनाने सोयाबीन ऐवजी कपाशी बियाण्यांचे मोफत वाटप सुरू केले. परंतु पेरणी आटोपल्यानंतर या बियाण्यांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. जिल्ह्यात कोरी बियाणे कंपनीकडून ५० हजार पाकिट वाटपाचे उद्दिष्ट्य असताना चार तालुक्यांतील केवळ १८१८ शेतकऱ्यांनी पाकिटांची उचल केली. त्यामुळे हा सर्व प्रकार खासगी बियाणे कंपनीच्या हितासाठी असल्याची घणाघाती टीका देखील आ. यशोमती ठाकूर यांनी सभागृहात केली. आधीच शेतकरी सर्व बाजूंनी अडचणीत असताना शासनाकडून कोणत्याही प्रकारे दिलासा देण्याचे प्रयत्न होेत नाहीत. शासन केवळ घोषणाबाजी करीत असल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात आक्रमकपणे मांडला. शेतकऱ्यांनी कपाशी बियाण्यांकडे पाठ फिरविली. सोयाबीन बियाण्यांना पसंती दिल्याने पडून असलेले कपाशीचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले. कृषी विभाग शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांच्या हितासाठी काम करीत असल्याचा आरोेपही आ. यशोमतींनी सभागृहात केला. (प्रतिनिधी)