शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गृहराज्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना खडसावले

By admin | Updated: April 25, 2016 00:10 IST

महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्या बंदीचा कायदा केला असतानाही अमरावती शहरातून दररोज दोन ट्रक गोमांस मुंबईला पाठविले जात आहेत.

गोवंश हत्या, वाहतूक प्रकरण : गंभीर आरोपअमरावती : महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्या बंदीचा कायदा केला असतानाही अमरावती शहरातून दररोज दोन ट्रक गोमांस मुंबईला पाठविले जात आहेत. यात पोलिसांचेही साटे-लोटे असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला होता. याप्रकरणी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना हे बेकायदेशीर कृत्य थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. शुक्रवारी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याविषयी विचारणा केली होती. शिष्टमंडळात मुस्लिम समाजातील कुरेशी समाजाच्या स्लॉटरिंग परमिट होल्डर्स अँड बिफ मर्चंट सोसायटीचे अध्यक्ष अन्सार अहमद कुरेशीदेखील उपस्थित होते. शहरात गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझादनगरात सुमारे १५ जण गोमांसाचा व्यवसाय करतात. यासाठी गोवंशाची कत्तल केली जाते. त्यांच्या पाठीशी एका राजकीय पक्षाच्या माजी नगरसेवकाचा वरदहस्त आहे. सुमारे दोन ट्रक गोमांस दिवसाकाठी शहरातून पाठविले जाते. विशेष म्हणजे पूर्वी गोमांसाचा व्यवसाय करणाऱ्या लोकांनी राज्य सरकारने कायदा केल्यानंतर गोवंश हत्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजातील कोणी गोवंश हत्या केली तर त्याला सोसायटीच्यावतीने ५० हजार रूपये दंडाची शिक्षा ठरवण्यात आली आहे. परिणामी नागपुरी गेट आणि खोलापुरी गेट पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये गोवंशहत्या बंद आहे. पण, पोलिसांचे साटेलोटे असल्याने गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद कॉलनीत आजही हा व्यवसाय सुरूच आहे. गोमांसाची वाहतूक बंद करा, अशी मागणी बीफ मर्चंट सोसायटीने वारंवार करूनही अमरावती पोलिसांनी त्याकडे डोळेझाक केली आहे. पोलिसांचे तोंड बंद ठेवण्यासाठी त्यांचे खिसे गरम करतो, अशी बतावणी गोमांसाचा व्यापार करणारे खुलेआम करतात, असा आरोपही शिवराय कुळकर्णी यांनी पोलीस आयुक्तांकडे केला होता.पुढील आठवड्यात शहरातील हा गोवंश हत्येचा व्यवसाय पूर्णपणे न थांबविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या एका पोलीस निरीक्षकांच्या नावे सतत तक्रारी केल्या जात आहेत. राज्य सरकार गोवंश रक्षणाच्या विषयावर गंभीर असताना अमरावतीमध्ये गोमांसाचा व्यवसाय होत असेल तर पोलीस प्रशासन त्यासाठी सर्वस्वी जबाबदार आहे. या संदर्भात कडक पावले उचलण्याचे निर्देश रणजित पाटील यांनी दिले आहेत.शुक्रवारी पोलीस आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात स्लॉटरिंग परमीट होल्डर्स अ‍ॅन्ड बिफ मर्चंट सोसायटीचे अध्यक्ष अन्सार अहमद कुरेशी, पदाधिकारी जायद हुसैन कुरेशी, जाकीर हुसैन कुरेशी यांच्यासह विहिंपचे विजय शर्मा, भाजपाचे शहर जिल्हा सरचिटणीस चेतन गावंडे, प्रभाकर थेटे, अभय बपोरीकर, भारत चिखलकर, प्रसाद जोशी, राजू कुरील, बादल कुळकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते. शिवराय कुळकर्णी यांनी पोलिसांना या विषयावर सचेत केल्यावर पोलीस वर्तुळात खळबळ उडाली होती. काल पोलिसांनी गस्त वाढविताच आझादनगरात हा धंदा करणाऱ्यांनी सारवासारवीचे प्रयत्न चालवले आहे. शहरात पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेली ही गोमांस वाहतूक तातडीने न थांबविल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिल्यानंतर आता पोलिसांनी याप्रकरणाला गांभिर्याने घेतल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)