शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषद अभियंत्याने तयार केली किमान खर्चाची सफाई मशीन     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 19:51 IST

मोर्शी येथील नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे अभियंता ऋषीकेश देशमुख यांनी शहरातील रस्ते झाडण्याकरिता किमान खर्चातून अनोख्या मशीनचा आविष्कार केला आहे.

अमरावती - मोर्शी येथील नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे अभियंता ऋषीकेश देशमुख यांनी शहरातील रस्ते झाडण्याकरिता किमान खर्चातून अनोख्या मशीनचा आविष्कार केला आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत घनकचरा संकलन, वाहतूक व प्रक्रियेकरिता राष्ट्रीय स्तरावर क्रमांक ठरविण्यात येणार असून शासन यादृष्टीने होणा-या प्रगतीच्या अनुषंगाने शहरांना स्टार रेटींग देण्यात येणार आहे. त्यात संपूर्ण शहरातील नागरी तसेच वाणिज्यिक क्षेत्रे दिवसातून दोन वेळा झाडल्यास शहराला उच्चतम स्टार रेटिंग मिळणार आहे. परंतु, नगरपरिषद मोर्शी स्वच्छतेच्या कामाकरिता केवळ १०-१२ कर्मचारी उपलब्ध आहेत. या मनुष्यबळाला साहाय्य करण्यासाठी अभियंता ऋषीकेश देशमुख यांनी झाडण्याचे यंत्र तयार केले. स्वच्छ महाराष्टÑ अभियानाच्या राज्य संचालकांनी मोर्शी शहरातील स्वच्छतेसंबंधी २३ आॅगस्ट रोजीच्या दौºयाच्या वेळी सदर आविष्कारासाठी त्यांचे कौतुक केले. सदर यंत्र तयार करण्याकरिता त्यांनी भंगारमध्ये उपलब्ध झालेल्या जुन्या आॅटोच्या डिफरंशियल असेंब्लीचा वापर करून स्थानिक कारागिरांची मदत घेतली. ही मशीन अधिकतम २० हजार रुपयांत तयार होऊ शकते. आठ ते दहा मजुरांचे काम ही एकटी मशीन करू शकते. त्यामुळे झाडण्याच्या कामावर होणाºया अतोनात मासिक खर्च वाचणार आहे. ऋषीकेश देशमुख यांनी मशीनकरिता अध्यक्ष शीला रोडे व मुख्याधिकारी वसंत इंगोले यांचे पाठिंब्यासाठी आभार मानले तसेच राज्यातील सर्व नगर परिषदांतील अभियंत्यांनी सदर मशीन तयार करून वापरण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Amravatiअमरावतीnewsबातम्या