शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करून मिनीट्रक पळविला

By admin | Updated: April 24, 2015 00:16 IST

तीन अज्ञात आरोपींनी एका मिनीट्रकचालकाला मारझोड करुन मालासह मिनीट्रक घेऊन पळ काढला. मंगळवारी रात्री ११ वाजता ही घटना मोर्शी ते वरुड मार्गावरील माडू नदीशेजारी घडली.

मोर्शी : तीन अज्ञात आरोपींनी एका मिनीट्रकचालकाला मारझोड करुन मालासह मिनीट्रक घेऊन पळ काढला. मंगळवारी रात्री ११ वाजता ही घटना मोर्शी ते वरुड मार्गावरील माडू नदीशेजारी घडली. अचलपूर येथील खडसे हे राज्य वीज वितरण कंपनीला लागणाऱ्या अ‍ॅल्युमिनियम वायर वाहतुकीचे कंत्राटदार आहेत. त्यांच्याकडे मालवाहून वाहन क्र.एम.एच.-२७ एक्स ६३६ या ट्रकवर अचलपूर येथीलच अशोक बाजीराव तळोकार हा वाहनचालक आहे. बुधवारी वाहन चालकाने गडचांदूर येथे काही माल वितरित केला. त्यानंतर भंडारा येथून त्याने या ट्रकमध्ये ३० बंडल अ‍ॅल्युमिनियम तार घेतले आणि तो काटोल-वरुड मार्गाने अचलपूर येथे परत जात होता. रात्रीच्या सव्वाअकरा वाजताच्या सुमारास मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या माडू नदीच्या पुलाशेजारी अज्ञात तिघांनी हात दाखवून चालकाला ट्रक थांबविण्यास भाग पाडले. या तिघांनी चालक अशोक तळोकार याला वाहनातून बाहेर खेचले. त्याचे हात दुपट्ट्याने बांधून बाजूच्या झुडुुपात त्याला लोटून दिले आणि वाहन वरुड मार्गाने तार बंडल आणि चालकाच्या भ्रमणदूरध्वनीसह पळवून नेले. वाहन पळवून नेल्यावर काही वेळाने चालकाने स्वत:चे बांधलेले हात सोडवून घेतले आणि मोर्शी गाठले. दूरध्वनीवरुन त्याने कंत्राटदार खडसे यांना घटनेची माहिती दिली. कंत्राटदाराच्या निर्देशाप्रमाणे चालकाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. ठाणेदार नीलिमा आरज यांनी भादंवीच्या कलम ३९२ प्रमाणे गुन्हे दाखल केले. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी राजा यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. तक्रार नोंदविल्यानंतर रात्रीपासूनच वाहन चालकाला सोबत घेऊन सहायक पोलीस निरीक्षक शीतल मालटे आणि त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांनी थेट काटोलपर्यंतचा मार्ग पिंजून काढला. आरोपींना अटक करण्यात यश प्राप्त झाले नाही. या घटनेमुळे खळबळ उडाली असली तरी या प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणातील तथ्य शोधून काढण्याचा चंग बांधला असून ठाणेदार नीलिमा आरज तपास करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)