शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मिनी बीडीओंना सीईओंनी सुनावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:11 IST

जिल्ह्यातील आतापर्यंत चार ओडीएफ झाले असून, धारणी व चिखलदरा वगळता इतर १२ तालुके ३१ डिसेंबरपर्यंत ओडीएफ करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देआढावा बैठक : ‘ओडीएफ’साठी जिल्हा परिषदेची विशेष मोहीम

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यातील आतापर्यंत चार ओडीएफ झाले असून, धारणी व चिखलदरा वगळता इतर १२ तालुके ३१ डिसेंबरपर्यंत ओडीएफ करण्यात येणार आहेत. सध्या धारणी व चिखलदरा तालुके हगणदारीमुक्त जिल्ह्यासाठी अडचण ठरत आहे. त्यामुळे १४ डिसेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी वरील दोन तालुक्यांतील बीडीओ, सहायक बीडीओ व मिनी बीडीओंची बैठक घेतली.संबंधित मिनी बीडीओ यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या ग्रा.पं.चा गावनिहाय आढावा घेतला. यावेळी ज्या मिनी बीडीओंची प्रगती समाधानकारक नसल्याने सीईओंनी ताकीद नोटीस बजावली आहे. यापुढील आढावा २३ डिसेंबर रोजी धारणी येथे घेतला जाणार आहे. तोपर्यंत कामात प्रगती दिसून न आल्यास कठोर कारवाईचा इशाराही सीईओंनी दिला आहे. २३ ते २५ डिसेंबर रोजी सीईओ कुळकर्णी दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायती प्रजाकसत्ताक दिनापूर्वी हगणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला भेटी देऊन वैयक्तिक शौचालये व इतर कामाची पाहणीसुद्धा करणार आहेत. याचवेळी बैठकीत ग्रामसचिवाने मुख्यालयाचे ठिकाणी नुसते हजरच नाही, तर मुक्कामी राहिले पाहिजेत, असे आदेश उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) यांना दिले आहेत. आकस्मिक भेटीदरम्यान मला किंवा मिनी बीडीओंना आढळून आल्यास किंवा ग्रामस्थ यांनी ग्रामसेवक गैरहजर असल्याबाबत तक्रार केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना बैठकीत कुलकर्णी यांनी दिल्या. बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे डेप्युटी सीईओ संजय इंगळे, नरेगाच्या डेप्युटी सीईओ माया वानखडे उपस्थित होत्या.अधिकारी करणार मुक्कामधारणी तालुक्यातील ६२ पैकी ३० ग्रामपंचायती, तर चिखलदरा तालुक्यातील ५३ पैकी ४२ ग्रामपंचायती १५ जानेवारीपर्यंत ओडीएफ होतील, असे उपस्थित अधिकाºयांनी सांगितले. धारणीमधील ३२ व चिखलदरा तालुक्यातील ११ ग्रामपंचायती अशा एकूण ४३ ग्रामपंचायतींमध्ये सीईओंच्या संकल्पनेतून २२ ते २४ जानेवारी या तीन दिवसांत दोन्ही तालुक्यांतील उर्वरित ४३ ग्रामपंचायतींमध्ये जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी एकाच वेळेला मुक्कामी राहून सर्व तीन दिवसांत हगणदारीमुक्त करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.