शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांची लाखोंनी फसवणूक

By admin | Updated: March 13, 2016 00:27 IST

शासकीय नोकरी मिळणे कठीण झाल्याने वाटेल त्या मार्गाने नोकरी मिळविण्याचे स्वप्न तरुणवर्ग पाहु लागला आहे.

प्रकरण वनविभागातील नोकरीचे : तिघांविरूध्द पोलिसात गुन्हा दाखलपवनी : शासकीय नोकरी मिळणे कठीण झाल्याने वाटेल त्या मार्गाने नोकरी मिळविण्याचे स्वप्न तरुणवर्ग पाहु लागला आहे. अशा बेरोजगार तरुण-तरुणींना लुबाडणारेसुध्दा आहेत. असाच काहीसा प्रकार पवनी तालुक्यात घडला असून वन विभागात नोकरी देण्याचे आमिष देवून लाखो रुपयाने बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या तीन इसमांविरुध्द तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.वनविभागात रोजंदारीवर काम करणाऱ्यांना कायम नोकरीत समाविष्ठ करण्याचा शासन निर्णय झालेला आहे. अशी खोटी बतावणी करुन सन २०१४ मध्ये तालुक्यातील शंभरावर युवक-युवतींकडून दोन लाख रूपये अग्रीम दिल्यास सहा लाखात कायम नोकरी मिळेल असे सांगुन भामट्यांनी रक्कम वसुल घेतली व वनविभागात वनरक्षक, वनपाल, वाहनचालक या पदावर कायम करण्यात येईल अशी हमी दिली. गेल्या वर्षभरात अनेकांनी जुगल किशोर चव्हाण (५३) रा. वर्धा, अशफाक अली अजगर अली (५०) रा. पद्मा वार्ड, पवनी व रवींद्र मधूकर डिब्बे (३४) रा. गोसेखुर्द यांचेसह संपर्क केला. परंतु त्यांनी टाळाटाळीचे धोरण सुरु केल्याने आपली फसवणूक झाल्याचे युवकांचे लक्षात आले.फिर्यादी दीपक सत्यवान साखरे (३४) रा. गोसे यांनी २७/७/२०१४ ला जुगल किशोर चव्हाण, अशफाक अली अजगर अली व रविंद्र डिब्बे यांचेकडे सहा लाख रूपये रोख दिले. त्यावेळी प्रतिक्षा यादीमध्ये तुमचा नंबर लागेल त्यानंतर प्रशिक्षणाला जावे लागेल असे सांगितले होते. काही दिवसांनी ४५ व्या क्रमांकावर नाव असलेली यादी व बनावट आदेश तक्रारकर्त्यास देण्यात आला. हा आदेश पाहुन इतरांनी देखील उर्वरित रक्कम संबंधितांकडे दिली. परंतु कोणलाही नियुक्ती आदेश प्राप्त झाले नाही. त्यामुळे फसवणुक झाल्याची शंका आल्याने आदेशाची प्रत व प्रतिक्षा यादी वनविभागाचे अधिकाऱ्यांना दाखविली असता असा कोणताही शासन निर्णय किंवा नियुक्त्या नाही असे समजले. फिर्यादी दिपक साखरे यांचे तक्रारीवरुन पवनी पोलिसांनी जुगोल किशोर चव्हाण रा. वर्धा, अशफाक अली अजगर अली रा. पवनी व रविंद्र मधूकर डिब्बे रा. गोसे बुज यांचे विरुध्द तक्रार दाखल केलेली आहे. पोलीस निरीक्षक मधूकर गिते तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)