शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीचे संत्रापीक बुडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:50 IST

आंबिया बहर : जिल्ह्यातील फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड इंदल चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यातील फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड ...

आंबिया बहर : जिल्ह्यातील फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाडइंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड कोसळल्याने यावर्षी आंबिया बहराची उत्पादित होणाऱ्या संत्राफळांची कोट्यवधींची उलाढाल प्रभावित होणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्याकरिता सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी होत आहे.जिल्ह्यात पपई, आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, केळी या फळबागांची लागवड करण्यात येते. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र संत्रापिकाचे असून, येथील संत्री चवीने गोड असल्याने विविध राज्यांत मोठी मागणी आहे. वरूड, मोर्शी, अंजनगाव, अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात ६ हजार ५०० हेक्टरमध्ये संत्राबागा मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या आंबिया बहराची संत्राफळे बाल्यावस्थेत असल्याने पाण्याची नितांत गरज भासत आहे. मात्र, परिसरातील पाण्याची पातळी १२ फूट खाली गेल्याने या फळबागांना दुष्काळाचा फटका बसत आहे. यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. अल्प पावसामुळे फळबागांवर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना फळबागा वाचविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बोअरवेल, विहिरींना कोरड पडल्याने जिल्ह्यातील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात आल्याने जिल्ह्यातील फळबागांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत फळबागा वाचविणे कठीण झाले आहे. अशा संकटकाळातही काही शेतकरी विकतचे पाणी घेऊन फळबागा जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. चांदूर बाजार, वरूड, मोर्शी, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे तालुक्यातील शेतकरी फळबागांमधून लागलेला खर्चही निघाला नसल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत.मृगाच्या संत्रा उत्पादनात कोट्यवधीची तूटमृग बहर आला तेव्हा जेमतेम स्थितीत शेतकऱ्हानी पाण्याची सोय केली होती. त्यामुळे मृग बहराची संत्राफळे आली; मात्र कोळशी, फायटोप्थोरा व डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळे काही प्रमाणात सडलीत. काहींची वाढ खुंटली, तर काही फळे मलूल पडली. त्यामुळे बाजारपेठेत भाव मिळू शकला नाही. त्यातही व्यापाºयांनी एकी करून तोकड्या भावात बगीचा मागितला. त्यामुळे ट्रक भरून संत्री बंगळुरु, हैद्राबादला पाठवावे लागले. मात्र, तेथेही किमान भाव मिळाला.उन्हामुळे संत्रा झाडे वाळलीवाढत्या उन्हामुळे संत्राझाडे वाळत आहे. झाडावर आंबिया बहर फुटला आहे. पाण्याअभावी उष्णतेचे प्रमाण वाढल्याने तसेच विहिरी व बोअर आटल्याने पाण्याची मात्रा वेळेत बसत नाही. त्यामुळे मूग, हरभराच्या आकाराची झालेली संत्राफळे मोठ्या प्रमाणात गळत आहेत. परिणामी संत्रा बागायतदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. पूर्वीचेच कर्ज फेडणे शक्य नसताना, आणखी कर्जाचा डोंगर हा शेतकरी कसा सहन करणार, असा प्रश्न मोर्शी तालुक्यातील काटपूर धामणगाव येथील शेतकरी विश्वासराव देशमुख यांनी केला. संत्र्याची अनेक झाडे उन्हामुळे वाळली असून, ती कुऱ्हाडीने तोडण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरला नाही.येथे जातात संत्राफळेजिल्ह्यातील संत्राफळ चवीने गोड असल्याने नागपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, केरळ, हैद्राबाद, बैंग्लोर आदी ठिकाणी विशेष मागणी आहे. हंगामात २५०० रुपये प्रतिक्विंटल दराने ट्रकद्वारे परराज्यात पोहचविले जातात. एका ट्रकमध्ये ४२० कॅरेट संत्राफळे बसतात. एका कॅरेटचे वजन २३ किलो असतो. एक ट्रक संत्राफळे ६० हजारांत विक्री होते.यावर्षी पोषक वातावरणामुळे फलधारणा चांगली झाली. पण, पाण्याचा अभाव व वाढते तापमान पाहता पिकेल किती, हा यक्षप्रश्न आहे. जमिनीत सध्या आर्द्रता अत्यल्प व तापमान ४० अंशाच्या वर असल्याने छोटी फळे टिकाव धरू शकणार नाही.- रमेश जिचकार, श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी लि. वरूड