शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरीत पक्ष्यांची पंढरी झाली प्लास्टिकमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 00:21 IST

छत्री तलाव ही पक्ष्यांची पंढरी म्हणून सर्वपरिचित आहे. नाना प्रकारच्या स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांची मांदियाळी याठिकाणी पाहायला मिळते.

छत्री तलावात प्रदूषण : पर्यावरणाला धोकावैभव बाबरेकर अमरावतीछत्री तलाव ही पक्ष्यांची पंढरी म्हणून सर्वपरिचित आहे. नाना प्रकारच्या स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांची मांदियाळी याठिकाणी पाहायला मिळते. मात्र, हे ठिकाण आता प्लास्टिकमय झाल्यामुळे पक्ष्यांसह पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. तरीसुद्धा छत्री तलावातील प्रदुषणाकडे जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासनही दुर्लक्ष करीत आहे. शहरातील काही पक्षी अभ्यासक पक्षांच्या अधिवासाच्या सुरक्षेबाबत सतर्क आहेत. यामध्ये दिशा फाउंडेशनने केलेल्या अभ्यासात आजवर एकूण २१४ प्रकारच्या पक्ष्यांची नोंद छत्री तलाव परिसरात झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये एकूण ६४ प्रकारच्या स्थलांतरीत पक्ष्यांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची संख्या ही जिल्ह्यातील समृद्ध जैवविविधतेचे प्रतिक आहे. याठिकाणी येणारे विदेशी पक्षी येथील खास वैशिष्ट्य आहे. पाणपक्षी व रानपक्षी असे दोन गट यामध्ये दिसून येतात. नोंद झालेल्या एकूण २१४ पक्ष्यांमध्ये ८५ प्रकारचे पाणपक्षी व १२९ प्रकारच्या रानपक्ष्यांचा समावेश आहे. म्हणजेच एकूण २१४ पक्ष्यांपैकी ४०% पक्ष्यांचा अधिवास हा छत्री तलाव या जलीय परिसंस्थेशी निगडित आहे. मात्र, आता छत्री तलावला घातक प्लास्टिकचा वेढा पडल्याने या पक्ष्यांचा अधिवासही धोक्यात आला आहे. तलावाचा मागच्या बाजूला प्लास्टिक द्रोण व प्लास्टिक पत्रावळींचा मोठा थर साचला आहे. त्यामुळे तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे. विशेषत: तलावाच्या मागच्या काठावरील पाणथळ चिखलात अनेक पक्षी वास्तव्य करतात. सोनटिटवा, जलरंक, धोबी आदी पक्ष्यांची जीवनक्रियाच या चिखलाणीवर अवलंबून असते. चिखलाणीमधील कीटक व इतर जीव या पक्ष्यांचे मुख्य खाद्य असते. काठावर संपूर्ण प्लास्टिक साचल्यामुळे पक्ष्यांचे जीवन अडचणीत आले आहे. पक्षीमित्र व छायाचित्रकार यादव तरटे, वैभव दलाल, मनोज बिंड यांनी छत्री तलावाला प्रदूषणमुक्त करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.