शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीमधील थकीत मालमत्तांचा आज लिलाव

By admin | Updated: June 7, 2016 07:15 IST

महापालिका प्रशासनाला ठेंगा दाखवीत कर थकविणाऱ्या एमआयडीसीमधील औद्योगिक मालमत्तांचा मंगळवार ७ जून रोजी लिलाव केला जाणार आहे.

उपायुक्तांच्या दालनात प्रक्रिया : करबुडव्या व्यावसायिकांमध्ये खळबळअमरावती : महापालिका प्रशासनाला ठेंगा दाखवीत कर थकविणाऱ्या एमआयडीसीमधील औद्योगिक मालमत्तांचा मंगळवार ७ जून रोजी लिलाव केला जाणार आहे. थकीत कर भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने नेमक्या किती मालमत्तांचा लिलाव मंगळवारी होईल, ती संख्या सोमवार सायंकाळपर्यंत निश्चित झालेली नव्हती.एमआयडीसी व सातुर्णा एमआयडीसीमधील ८९ मालमत्तांच्या लिलावाची नोटीस १२ मे रोजी काढण्यात आली होती. या औद्योगिक मालमत्ताधारकांकडे तब्बल दीड कोटी रूपयांचा कर थकीत आहे. वारंवार नोटीस देऊनही कराच्या रकमेचा भरणा न करता महापालिकेविरोधात एमआयडीसीमधील काही उद्योजक उच्च न्यायालयात गेले होते. दरम्यान महापालिका आयुक्तांच्या आदेशाने थकीत करापोटी या ८९ मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या व त्यानंतर ७ जूनला दुपारी ४ वाजता या मालमत्तांचा लिलाव करण्याचे ठरले. त्यानुसार या थकीत मालमत्ताधारकांच्या औद्योगिक मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. तत्कालिन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी धाडसी निर्णय घेऊन या मालमत्तेची जप्ती व लिलावाची नोटीस काढली होती. त्या पार्श्वभूमिवर मंगळवारी किती मालमत्तांचा लिलाव होतो, की त्यांना अभय दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे. जप्त मालमत्तेच्या जाहीर लिलावाबाबत नोटीस जारी केल्यानंतर उद्योग वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. लिलावाच्या भीतीपोटी अनेक उद्योजकांनी थकीत रक्कम सुद्धा भरली तर अनेकांनी रकमेचे टप्पे पाडून सवलत पदरात पाडून घेतली. त्यानंतरही ज्या थकीत मालमत्ताधारकांनी जाहीर लिलावाच्या गांभीर्याने घेतले नाही, त्यांच्या मालमत्तेचा लिलाव मंगळवारी अपेक्षित आहे. लिलावाबाबत नवनियुक्त आयुक्त हेमंत पवार यांच्या भूमिकेकडेही महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)लिलावाच्या नोटीसनंतर ज्या मालमत्ताधारकांनी थकीत रकमेचा भरणा केला किंवा ज्यांनी सवलत मागून घेतली त्यांच्या व्यतिरिक्त उर्वरित मालमत्तांसाठी मंगळवारी (७ जून) लिलाव प्रक्रिया घेण्यात येईल.- विनायक औगडउपायुक्त (प्रशासन)