शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

सीपींच्या कारवाईने मध्यरात्रीची वर्दळ कमी

By admin | Updated: October 30, 2016 00:12 IST

पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सुरू केलेल्या 'आॅल आऊट आॅपरेशन' मोहिमेमुळे शहरातील मध्यरात्रीची वर्दळ कमी झाली आहे.

वाहन तपासणीवर जोर : अवैध व्यावसायिकांसह गुन्हेगारांचे धाबे दणाणले अमरावती : पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सुरू केलेल्या 'आॅल आऊट आॅपरेशन' मोहिमेमुळे शहरातील मध्यरात्रीची वर्दळ कमी झाली आहे. या कारवायामुळे अवैध व्यवसायीकांसह गुन्हेगारांचे धाबे दणाणल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे पोलिसांची ही कारवाई गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांत पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या नेत्तृत्वात शहरात मध्यरात्री गस्त घालण्यात येत आहे. मंडलिकांच्या दंबग कारवाईमुळे पोलीस यंत्रणा सळो की पळो झाली आहे. मात्र, या प्रकारच्या कारवाईमुळे गुन्हेगारासंह अवैध धंद्यांवर अंकुश ठेवणे शक्य आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना जेरबंद केलेत. अवैध व्यावसायिकांवर कारवाई केली. वाहनांची तपासणी मध्यरात्री करण्यात आली. त्यामुळे नियमबाह्य काम करणारे नागरिक रस्त्यावर फिरणाऱ्यास धास्तावले आहे. शहरात मध्यरात्री अनेक विद्यार्थी विनाकारण फिरतात, त्यांनीही पोलिसांचा चांगलाच चाप बसला आहे. पोलीस आयुक्तांनी शहरात गस्त घालून विना परवाना दारू पिणाऱ्यावर कारवाई केली. त्यातच छुप्या मार्गाने दारू पिणाऱ्यांचे अड्डे उध्दस्त केले. त्यामुळे मध्यरात्री शहरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. (प्रतिनिधी)शुक्रवारी मध्यरात्रीची कारवाई शुक्रवारी मध्यरात्री पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त शशिकुमार मिना, विवेक पानसरे व प्रदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात १५ अधिकारी व १०० पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरात गस्त व नाकाबंदी केली. त्यामध्ये ५१० वाहनांची तपासणी करण्यात आली. नियमभंग करणाऱ्या ९७ वाहनावर मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे नोंदविले आहे. नाकाबंदीदरम्यान शहर वाहतूक पोलिसांनी रेल्वे स्थानक चौकात ७० वाहनांची तपासणी केली. त्यात २८ वाहनावर कारवाई केली. शेगाव नाका परिसरात ६५ वाहनांची तपासणी करून २१ वाहनावर कारवाई केली. ज्ञानमाता हायस्कुलजवळ ४५ वाहनांची तपासणी करून २० वाहनावर कारवाई केली. दस्तुर नगरात वाहन क्र. एमएच २९ एडी-५७०० मधून विदेशी दारूचा माल जप्त केला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमिवर ही मोहीम राबविली जात आहे.