शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आत सदस्यांचा गदारोळ ; बाहेर शिक्षकांचे आंदोलन

By admin | Updated: July 19, 2014 23:41 IST

शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहाच्या आत सदस्य विविध मुद्यावरुन गदारोळ करीत असताना सभागृहाबाहेर शिक्षकवृंद हे थकीत वेतनाची मागणी रेटून होते. शिक्षकांच्या वेतनाचा वाद चिघळू नये,

वेतनाचा प्रश्न : सर्वसाधारण सभेत पोहोचले अमरावती : शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहाच्या आत सदस्य विविध मुद्यावरुन गदारोळ करीत असताना सभागृहाबाहेर शिक्षकवृंद हे थकीत वेतनाची मागणी रेटून होते. शिक्षकांच्या वेतनाचा वाद चिघळू नये, यासाठी विलास इंगोले, बबलू शेखावत, चेतन पवार, हमीदाबी अफजल चौधरी या पदाधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकारी सविता चक्रपाणी आदींनी शिक्षकांची समजुत काढली. मात्र शिक्षक वृंद हे सर्वसाधारण सभा संपेपर्यत बाहेरच होते.एप्रिल, मे व जून महिन्याचे थकीत वेतन मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या माध्यमातून सतत प्रयत्न सुरु आहे. आयुक्त, महापौर, पदाधिकाऱ्यांना साकडे घातल्यानंतरही वेतन मिळत नसल्याने शिक्षकांनी थेट शनिवारी सर्वसाधारण सभेच्या बाहेर आंदोलन करुन वेतनाची जोरदार मागणी केली. नियमित वेतन मिळत नसल्याने अनेक संकटाच्या सामोरे शिक्षकांना जावे लागत असल्याची बाब यावेळी प्रामुख्याने मांडल्या गेली. येत्या काही दिवसात रमजान ईद असल्याने मुस्लिम समाजाच्या शिक्षकांपुढे बऱ्याच समस्या असल्याची बाब मांडण्यात आली. ईद पूर्वी दोन महिन्यांचे वेतन अदा करण्यात आले नाही तर २३ जुलै पासून बेमुदत शाळा बंद करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. सभागृहाच्या आत सदस्य वेगवेगळया विषयावर चर्चा करीत असताना शिक्षक बाहेर वेतनासाठी बसले होते. महापालिकेची आर्थिक स्थिती हलाखिची असल्याची बाबही यावेळी चर्चिल्या गेली. पाच शाळांमध्ये ‘ ई-लर्निंग’ ला मंजुरीखासगी शाळांच्या स्पर्धेत महापालिकांच्या शाळांचा टिकाव लागावा यासाठी आयुक्त अरुण डोंगरे यांच्या कल्पकतेतून पाच शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर ‘ई-लर्निंग’ प्रणाली सुरु करण्यासाठी मंजुरी प्रदान करण्यात आली. वडाळी, नूरनगर, गोपालनगर, भाजीबाजार व बडनेरा येथील शाळांमध्ये ही प्रणाली सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यावेळी प्रदीप दंदे यांनी विलासनगर येथील शाळेत ही प्रणाली का सुरु करण्यात आली नाही, या विषयावरुन शिक्षण विभागाला धारेवर धरले. निधीची गरज असेल तर वॉर्ड विकासातून घ्या, मात्र विलासनगरातील शाळेत हा उपक्रम राबवा, ही मागणी लावून धरली. उपायुक्त रमेश मवासी यांनी मागणी नुसार या शाळेत ही प्रणाली सुरु करण्याचा शब्द दिला. हा नवीन उपक्रम सुरु केल्याबद्दल मिलिंद बांबल, रिना नंदा, जयश्री मोरे, बबलू शेखावत, निलिमा काळे आदींनी प्रशासनाचे कौतूक केले.