शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील मागास आर्थिक विकास महामंडळांचे विलिनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 11:41 IST

वर्षानुवर्षे आर्थिक विवंचनेत खितपत पडलेल्या मागासवर्गीयांसाठी चार आर्थिक विकास महामंडळांची स्थापना करण्यात आली. मात्र, गत तीन वर्षांपासून या महामंडळांना अनुदान मिळत नसून, आता त्यांचे विलिनीकरण होणार आहे.

ठळक मुद्देतीन वर्षांपासून अनुदान नाहीमंत्रालय स्तरावर वेगवान हालचाली

गणेश वासनिक।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वर्षानुवर्षे आर्थिक विवंचनेत खितपत पडलेल्या मागासवर्गीयांना रोजगार निर्मितीसह उत्पन्नाची साधने निर्माण व्हावीत, स्वतंत्रपणे उद्योगधंदे उभारता यावेत, यासाठी चार आर्थिक विकास महामंडळांची स्थापना करण्यात आली. मात्र, गत तीन वर्षांपासून या महामंडळांना अनुदान मिळत नसून, आता त्यांचे विलिनीकरण होणार आहे. त्याअनुषंगाने मंत्रालयात वेगवान हालचाली सुरू झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांनी काही वर्षांपूर्वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात कोट्यवधींचा घोटाळा केल्याची बाब निदर्शनास आली. आ. कदम हे त्यावेळी या महामंडळाचे अध्यक्ष होते. घोटाळ्याप्रकरणी चौकशीअंती आ. कदम यांच्यासह काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, स्वत: कदम हे कारागृहात जेरबंद आहेत. मात्र, मागास आर्थिक विकास महामंडळे ही भ्रष्टाचाराची कुरणे असल्याची आवई ठोकून या महामंडळांना राज्य शासनाने अनुदान देणे बंद केल्याची माहिती आहे. या चारही महामंडळांची कार्यालये टोलेजंग इमारतीत असली तरी अधिकारी-कर्मचारी हे केवळ वेतनापुरते कर्तव्यावर आहेत. यापूर्वी मागासवर्गीयांना उद्योगधंदे, व्यवसाय थाटण्यासाठी भागभांडवल उभे करायचे असल्यास ‘समाजकल्याण’ कार्यालातून मोठा आधार मिळत होता. परंतु, आता या आर्थिक विकास महामंडळातून रोजगार, उद्योगधंद्यासाठी अनुदान किंवा कर्जपुरवठा मिळत नसल्याने मागासवर्गीय कधीही उद्योगधंदे, लघुउद्योग साकारू शकत नाही.माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या कार्यकाळात सन २००८ मध्ये मागास आर्थिक विकास महामंडळांचे ११०० कोटी रुपयांचे थकीत कर्ज माफ करून मागासवर्गियांना नव्याने रोजगार, उद्योगधंदे निर्माण करण्याची उभारी दिली होती. परंतु, त्यानंतरच्या शासनकर्त्यांनी या महामंडळांकडे लक्ष दिले नाही. याविषयी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही.चारही महामंडळे गुंडाळणारही चारही महामंडळे गुंडाळण्याची तयारी शासनस्तरावर सुरु आहे. यात महात्मा फुले आर्थिक मागासवर्गीय विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, अपंग आर्थिक विकास महामंडळ यांचा समावेश आहे. ही सर्व महामंडळे महात्मा फुले आर्थिक मागासवर्गीय विकास महामंडळात विलीन होणार असल्याची माहिती आहे.ओबीसी, व्हीजेएनटीसाठी स्वतंत्र कारभारसामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातून इतर मागासवर्गीय विकास महामंडळ, वसंतराव नाईक भटक्या, विमुक्त जाती व जमाती आर्थिक विकास महामंडळांचा कारभार काढण्यात आला आहे. ओबीसी व व्हीजेएनटी आर्थिक विकास महामंडळांसाठी मंत्रालयात स्वतंत्र कार्यालय गठीत केले जाणार आहे. त्याकरिता राज्याचे जलसंपदा व गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती ओबीसी, व्हीजेएनटीबाबत निर्णय घेणार आहे.

टॅग्स :Governmentसरकार