शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अचलपुरात व्यापाऱ्यांचा माल रस्त्यावर

By admin | Updated: February 4, 2015 23:07 IST

येथील काही व्यापारी आपल्या प्रतिष्ठानचा माल अर्ध्या रस्त्यापर्यंत आणून ठेवतात. काही जण दुकानाचा फलक रस्त्यावर ठेवतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो.

वाहतूक विस्कळीत : नगरपालिकेचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त अचलपूर : येथील काही व्यापारी आपल्या प्रतिष्ठानचा माल अर्ध्या रस्त्यापर्यंत आणून ठेवतात. काही जण दुकानाचा फलक रस्त्यावर ठेवतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे. पायी चालणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र नगरपालिका प्रशासन यावर काहीच कारवाई करायला तयार नाही.जुळ्या शहरात अनेक समस्या आहेत. त्या समस्यांना तोंड देताना नागरिक अगदी मेटाकुटीला आले आहेत. अतिक्रमण मग ते छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे असेल किंवा आमचे कोण काय बिघडवते, असे मनात ठामपणे मांडून काही मोठे व्यापारी राजरोसपणे आपापल्या प्रतिष्ठानांसमोर दुकानातील माल अगदी रहदारीला अडथळा निर्माण होईल इतपत रस्त्यावर आणून लावण्यात स्वत:ला धन्य समजत आहे. एवढेच नव्हे, तर फलक दुकानावर लावलेले असतानाही दुसरे फलक रस्त्याच्या मधोमध आणून रहदारीला अडथळा निर्माण करण्याचे कार्य अगदी न चुकता करीत आहेत. असे चित्र परतवाड्यातील बस स्थानक मार्ग, मेन रोड, सदर बाजार, गुजरी बाजार, दुराणी चौक, मिश्रा चौक यासह आदी ठिकाणी हमखास बघायला मिळते. अचलपूर येथे चावलमंडी, देवडी, पोलीस स्टेशन रोड, उपजिल्हा रुग्णालयाचा रस्ता, गांधी पूल, सराफा लाईन, बुद्धेखा चौक आदी ठिकाणी यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही.यात आणखी भर म्हणजे अस्तव्यस्त उभ्या केलेल्या दुचाकी वाहनांची गर्दी आदी प्रकारामुळे सामान्य माणूस भरडला जात आहे. बाजारहाट करायला निघालेल्या महिलांना याचा विशेष करून अधिक त्रास सहन करावा लागत आहे. बेशिस्तपणे वाहने उभे करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याची व्यवस्था नगरपरिषदेकडे आहे. पण त्यांचा वापर न करता नगरपरिषद संपूर्णपणे पोलीस प्रशासनावर अवलंबून राहत आली आहे. पोलीस आपल्या कामात किती तत्पर आहे याचे भान नगरपरिषदेला नाही, असेच म्हणावे लागेल.नगरपरिषदेद्वारा काही दिवसांपूर्वी अनेक भागात डांबरी रस्ते तर कुठे काँक्रीट रस्ते तयार करण्यात आले. मात्र यारस्त्यांचे काम कसे होत आहे त्याचा दर्जा काय आहे, डांबराचे प्रमाण बरोबर आहे की नाही, सिमेंटच्या रस्त्यात सिमेंट किती टाकले याची दखल कोणीही घेताना दिसले नव्हते. या कामांवर कधी नगरपरिषदेचा अधिकारी आढळून आला नव्हता. शहरात झालेल्या डांबरी व काँक्रीट रस्त्याचे बांधकाम नित्कृष्ट झाल्याचे दिसून येत आहे. याला जबाबदार कोण? सगळा कमिशनचा धंदा सुरू असल्याचे बोलले जाते.जनतेचा पैसा असा उधळण्यासाठी कोणी परवानगी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनीच याबाबत कानउघाडणी करण्याची गरज आहे. शहरात अनेक ठिकाणी अवैध बांधकामे सुरू असल्याचा आणि बांधकाम साहित्य टाकण्याचे प्रकार तर चिंतेचा विषय बनला आहे. सुस्त प्रशासनास कोणीतरी जागे करण्याची वेळ आली आहे. (शहर प्रतिनिधी)