शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

मेळघाटच्या विद्यार्थ्यांना मिळणार माणुसकीची उब!

By admin | Updated: December 25, 2014 23:25 IST

सध्या कडाक्याची थंडी जाणवतेय. शहरातील नागरिकही थंडीने कुडकुडत आहेत. अशा स्थितीत ग्रामीण भागातील त्यातही मेळघाटातील आदिवासी अतिदुर्गम गावात थंडीने कहर केलाय.

जितेंद्र दखणे - अमरावतीसध्या कडाक्याची थंडी जाणवतेय. शहरातील नागरिकही थंडीने कुडकुडत आहेत. अशा स्थितीत ग्रामीण भागातील त्यातही मेळघाटातील आदिवासी अतिदुर्गम गावात थंडीने कहर केलाय. म्हणूनच जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने पुढाकार घेऊन अन् कर्मचाऱ्यांच्या वेतनातून थोडी-थोडी कपात करून मेळघाटातील जि.प.शाळेतील चिमुकल्यांना स्वेटर वितरित करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी अमलातही आणला असून २९ व ३० डिसेंबर रोजी चिखलदरा तालुुक्यात या उपक्रमाला सुरूवात होणार आहे. एरवी शासकीय कर्मचाऱ्यांवर ‘निर्ढावले’पणाचा शिक्का लावला जातो. इतरांच्या सुख-दु:खाशी काहीही घेणे-देणे नसलेला वर्ग असेही यांच्याबाबत बोलले जाते. परंतु जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने या सर्व कल्पनांना फाटा दिला. प्रत्यक्ष कृतीतून आपण किती सहिष्णू आणि माणुसकीचा धर्म पाळणारे आहोत, हे त्यांनी दाखवून दिले. समाजभान जपण्याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले आहे. कडाक्याच्या थंडीत कुडकुडणारी मेळघाटातील आदिवासी मुले डोळ्यांपुढे ठेवून जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने या मुलांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतनातून पैसे गोळा करून ५०० आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वेटर खरेदी केले आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ २४ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, माजी अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले सरिता मकेश्र्वर, सदस्य प्रमोद वाकोडे अभय वंजारी आदींच्या हस्ते करण्यात आली. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सर्व पदाधिकारी येत्या २९ व ३० डिसेंबर रोजी चिखलदरा तालुक्यातील मोरगढ आणि हत्तीघाट व धारणी तालुक्यातील हिराबंबई, भवई ढाणा, दादरखेडा शिवाझिरी चित्रीकोट, किवटी आदी गावांमधील जिल्हा परिषदेतील शाळेत शिक्षण घेणाऱ्या चिमुल्यांना स्वेटरवाटप करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हापरिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष पंकज गुल्हाने, ज्ञानेश्र्वर घाटे, श्रीकांत मेश्राम, मंगेश मानकर, अमोल कावरे, ऋषिकेश कोकाटे, प्रशांत धर्माळे, संजय खारकर, तुषार पावडे गजानन जुनघरे, नितीन माहोरे, लाभेश राऊत, तारकेश्र्वर घोटेकर, रूपेश देशमुख, ईश्वर राठोड, लीलाधर नांदे, राजेश पवार, अशोक थोटांगे, रवी धर्माळे, सागर मारोटकर, दहिकर, दुबळे वाकपांजर व अन्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या सदस्यांनी गोळा केलेल्या पैशातून खरेदी करण्यात आलेले स्वेटर मेळघाटातील चिमुकल्या आदिवासी विद्यार्थ्यांना गारठवणाऱ्या थंडीत ‘मायेची, माणुसकीची ऊब देणार आहेत. समाजातील इतर जबाबदार घटकांनीदेखील या कृतीचा आदर्श घेऊन समाजकल्याणासाठी पुढाकार घेतल्यास अनेक वंचितांना दिलासा मिळू शकतो.