शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी मेळघाट सज्ज

By admin | Updated: November 29, 2014 00:19 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मेळघाट दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी महसूल, आरोग्य व वनविभाग सज्ज झाला आहे.

श्यामकांत पाण्डेय धारणीराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मेळघाट दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी महसूल, आरोग्य व वनविभाग सज्ज झाला आहे. मेळघाटातील पहिल्या दौऱ्यात त्यांना आॅलवेल दाखविण्यासाठी सर्व विभागाने कंबर कसली आहे. आतापर्यंत एमआरईजीएसचे कोणतेही काम सुरू नव्हते. परंतु त्यांना कामे सुरू असल्याचे दाखविण्यासाठी वनविभाग, ग्रामपंचायत आणि जि.प. बांधकाम विभागाकडून तडकाफडकी कामे सुरू करण्यात आली आहे. सर्वप्रथम मुख्यमंत्री ज्या आश्रम शाळेच्या प्रांगणात हॅलिपॅडवर उतरणार आहे तेथील विद्यार्थ्यांच्या सुखसुविधा रातोरात बदलविण्यात आले. आंथरुन, पांघरुनसह चवदार जेवण दिल्या जात असल्याने तक्रारीची शक्यता लपविण्याचा प्रयत्न आश्रम शाळा प्रशासन करीत आहे. हॅलिपॅडचे काम पूर्णत्वास आले आहे. वन मालूर या गावात मुख्यमंत्री धावती भेट देणार आहे. त्यासाठी शॉर्टकट असलेल्या मार्गावर मुरुम टाकून पाणी टाकून रोलिंग करण्यात आले आहे. ऐरवी हा रस्ता पायी चालण्यायोग्यही नव्हता. पण आता या रस्त्यांचे भाग्य पालटले आहे. शाळा चकचकीत करण्यात आल्या आहेत. गावात जंगलाचे संरक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या वन संरक्षण समितीच्या अध्यक्ष व सदस्यांना आॅलवेलची बाराखडी शिकविण्यात आली आहे. गावात सर्व काही व्यवस्थित दाखविण्याचा प्रयत्न वनविभाग करीत आहे. ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्री खूश होती हे मात्र निश्चित.