शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात कोविडच्या लसीकरणासाठी डॉक्टरने केली आदिवासीच्या शेतात पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:09 IST

फोटो - ०३एएमपीएच०७ - आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात पेरणीसाठी घाम गाळताना डॉ. दीपक कुंडेटकर. लोकमत विशेष संडे स्टोरी नरेंद्र जावरे ...

फोटो - ०३एएमपीएच०७ - आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात पेरणीसाठी घाम गाळताना डॉ. दीपक कुंडेटकर.

लोकमत विशेष

संडे स्टोरी

नरेंद्र जावरे - चिखलदरा (अमरावती) : अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या मेळघाटात कोविडच्या लसीकरणाला आदिवासी शेतकरी दांपत्याचा होकार मिळविण्यासाठी एका डॉक्टरने त्या शेतकऱ्याच्या शेतात चक्क पेरणीसाठी घाम गाळला. सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रेहट्याखेडा येथे मागील आठवड्यात ही घटना घडली. संबंधित डॉक्टरचे सर्वत्र कोैतुक होत आहे.

आदिवासी बांधव आजही लसीकरणासाठी तयार होत नाहीत. त्यांचे मन वळविण्यासाठी डॉक्टरांना काय-काय करावे लागेल, याचा नेम नाही. मेळघाटातील अतिदुर्गम रेहट्याखेडा, बोराट्याखेड्या, भवई, तारुबांदा या आदिवासी पाड्यांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून मागील एक वर्षापासून दीपक कुंडेटकर हे कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत परिचारिका प्रगती शिरस्कर, शांता उईके, एमपीडब्ल्यू बेठेकर, अमोल मेटकर, विजय धुर्वे हे कोविड लसीकरणासाठी जनजागृती व लसीकरण करीत आहेत. तथापि, मेळघाटातील आदिवासी नकार देत असल्याने आरोग्य यंत्रणेपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

बॉक्स

गर्भवती पत्नीला घेऊन करीत होता पेरणी

शहरी भागात गर्भवती महिला विविध दवाखाने व डॉक्टरांचा सल्ला घेऊन आराम करतात. परंतु, रेहट्याखेडा येथील रामचंद्र चतुर व त्याची पत्नी सुगंती गर्भवती शेतात पतीसोबत ज्वारी व धान (भात) पेरणी करीत होती. तिची नियमित तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने शोध घेतला. मात्र, सुगंती पतीसोबत शेतात ज्वारीची पेरणी करण्यास गेली होती. डॉ. दीपक कुंडेटकर चमूसह शेतात गेले. त्यांनी लसीकरण उच्चारताच या चतुर दाम्पत्याने प्रतिसाद दिला नाही, उलट शिव्यांची लाखोळी वाहिली. मात्र, डॉक्टर व कर्मचारीही आपल्या कर्तव्याशी ठाम राहिले. काही झाले तरी या १२ ते १३ जणांच्या कुटुंबात गर्भवतीची तपासणी, तिला किट तसेच इतरांचा लसीकरणासाठी होकार घेऊ, मगच गावात जाऊ, असा त्यांनी सांगताच, ‘आम्हाला मारून टाकतो का?’ असा प्रतिहल्ला चमूला झेलावा लागला. अनेक अपमानास्पद शब्द ऐकावे लागले. या बाबीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बॉक्स

पेरणी करून दे

गर्भवती सुगंतीची डॉ. कुंडेटकर यांनी समजूत घातली. लसीकरणाचे महत्त्व पटविले. त्यावेळी तिने प्रतिप्रश्न केला, मग पेरणी कोण करून देईल? डॉक्टरांनी यावेळी २० ते २५ मिनिटे ज्वारी व धान पेरणी केली. हे पाहून आदिवासी दाम्पत्य अखेर ओशाळले. लवकरच पेरणी आटपून लसीकरणाला येत असल्याचा शब्द त्यांना मिळाला. येत्या आठवड्यात त्यांचे लसीकरण आता केले जाणार आहे.

बॉक्स

फक्त १० जणांचे लसीकरण

मेळघाटातील काही आदिवासी पाड्यांमध्ये शंभर टक्के लसीकरण झाल्याची अभिमानास्पद बाब पाहता, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही कौतुक केले आहे. अशातच रेहट्याखेडा येथे केवळ दहा जणांनी लसीकरण केले. २२ जून तीस जणांच्या लसीकरणासाठी चमू गेली होती. आता पुढच्या आठवड्यात चतुर कुटुंबीयांची लसीकरण केले जाणार आहे. त्यांनी स्वतःहूनच आता डॉक्टरांना बोलावल्याचे दीपक कुंडेटवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कोट

रेहट्याखेडा येथे गर्भवती महिलेची तपासणी व लसीकरणासाठी गेलो असता, शेतात ती महिला पतीसह पेरणी करीत होती. दोन्ही बाबींना त्यांनी नकार दिला. पेरणीसाठी थोडा वेळ मदत केली आणि त्यांचा होकार घेतला. आता पुढील आठवड्यात त्यांचे लसीकरण केले जाणार आहे.

- डॉ. दीपक कुंडेटवार, समुदाय आरोग्य अधिकारी, सेमाडोह, ता. चिखलदरा