शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी विशिष्ट कंपनीवर मेहेरनजर !

By admin | Updated: June 20, 2017 00:02 IST

शहराच्या दैनंदिन स्वच्छतेसाठी प्रभागनिहाय कंत्राटदार न नेमता ते कंत्राट एकाच मल्टिनॅशनल कंपनीला देण्याच्या प्रस्तावाला स्थायीने हिरवी झेंडी दिली आहे.

होमवर्कसाठी ‘त्या’ कंपनीची मदत : विरोध वाढला, केंद्रीय पद्धतीने कंत्राटप्रदीप भाकरे । लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराच्या दैनंदिन स्वच्छतेसाठी प्रभागनिहाय कंत्राटदार न नेमता ते कंत्राट एकाच मल्टिनॅशनल कंपनीला देण्याच्या प्रस्तावाला स्थायीने हिरवी झेंडी दिली आहे. तथापि स्थायीच्या निर्णयाला भाजप नगरसेवकांचाच विरोध असल्याने ‘तुषार भारतीय वर्सेस आॅल’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने पुन्हा एकदा ‘मल्टिनॅशनल कंपनी’चा मुद्दा समोर आला असून एका विशिष्ट कंपनीसाठी ‘रेडकार्पेट’ अंथरले गेल्याचे चित्र आहे.तूर्तास ४३ प्रभागात ४३ कंत्राटदार कार्यरत आहेत. याशिवाय शहरातील बाजारांच्या स्वच्छतेची जबाबदारी अन्य कंत्राटदारांवर आहे. या कंत्राटाची मुदत संपल्याने २२ प्रभागांसाठी निविदा प्रक्रिया राबविली गेली. मात्र, सत्तास्थानी भाजप विराजमान झाल्यानंतर स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी प्रभागनिहाय स्वतंत्र कंत्राटदार न नेमता संपूर्ण शहरासाठी एकाच मल्टिनॅशनल कंपनीला पाचारण करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. ११ मे रोजी झालेल्या स्थायीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करून पुढील कारवाईसाठी तो प्रशासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, या प्रस्तावाला भाजपकडून नव्हे तर विरोधी पक्षाकडूनही जोरदार विरोध झाला. त्यामुळे स्थायी समिती बॅकफुटवर आली. मात्र, इंदोर दौऱ्यानंतर मल्टिनॅशनल कंपनीच्या कंत्राटाच्या मुद्याने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. मागील दोन महिन्यांपासून मल्टिनॅशनल कंपनीबाबतच्या प्रस्तावाचे होमवर्क स्थायी आणि प्रशासनाकडून केले जात आहे. इंग्रजी वर्णमालेतील तीन अक्षरे मिळून असलेल्या एका कंपनीसाठी हा घाट रचला जात असल्याच्या आरोपाला या होमवर्कमुळे बळ मिळाले आहे.‘त्या’ कंपनीकडून होमवर्क !अमरावती : या कंत्राटाची संपूर्ण पूर्वतयारी या कंपनीकडून करवून घेतली जात असल्याने स्वत:ला पोषक ठरणाऱ्या अटी-शर्तींचा समावेश ही कंपनी करेल. सत्ताधिशांमधील काहींचा इंटरेस्ट या कंपनीबाबत जगजाहीर असल्याने प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. निविदा प्रक्रिया होण्यापूर्वीच याविशिष्ट कंपनीसाठी रेडकार्पेट अंथरले गेले आहे. वर्षाकाठी ४० ते ४५ कोटींचा हा प्रस्ताव ५ वर्षांसाठी २०० कोटींच्या घरात जात असल्याने यात कोट्यवधींचे अर्थकारण साधले जाणार आहे. अमरावती शहराची स्वच्छता करण्यास इंटरेस्टेड असलेल्या एका विशिष्ट कंपनीला मनपा प्रशासन आणि एका पदाधिकाऱ्याकडून झुकते माप दिले जात आहे. ‘वन मॅन कॉन्ट्रॅक्टरशिप’चे टेन्डर डॉक्युमेंट कसे असावेत, यांसह निविदांमध्ये कोणत्या अटी-शर्ती घालायच्या याचे ‘होमवर्क’ ती विशिष्ट कंपनीच करते आहे.‘त्या’ विशिष्ट कंपनीसाठीच घाटस्थायी समिती सभापती तुषार भारतीय केंद्रीय पद्धतीच्या कंत्राटासाठी आग्रही आहेत. याबाबतचा त्यांचा ‘इंटरेस्ट’ जगजाहीर आहे. तथापि, निविदा भरणाऱ्या आणि कॉमिट करणाऱ्या कंपनीकडून कंत्राटाचे होमवर्क केले जात आहे. त्यासाठी बैठकींचे सत्र वाढले असताना ‘त्या’ विशिष्ट कंपनीसाठी या नव्या कंत्राटाचा ‘घाट’ रचला जात असल्याचे उघड झाले आहे.कंत्राटाबाबतच्या अटी-शर्ती स्थायी समितीच्या पुढील बैठकीत ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यानंतर मल्टीनॅशनल कंपनीला दैनंदिन साफसफाईचे कंत्राट देण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया करण्यात येईल. - तुषार भारतीय,सभापती, स्थायी समितीस्थायी समितीने याबाबत अटी, शर्तीसह सर्वसमावेशक प्रस्ताव ठेवण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. दैनंदिन साफसफाईच्या कंत्राटाबाबत त्यानंतर प्रशासनाच्यावतीने उचित निर्णय घेण्यात येईल. - हेमंत पवार,आयुक्त, महापालिका