शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
5
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
6
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
7
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
8
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
9
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
10
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
11
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
12
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
13
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
14
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
15
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
16
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
17
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
18
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
19
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
20
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना

सखींच्या स्वरांनी वाढविला मेहंदीचा रंग

By admin | Updated: December 11, 2015 00:21 IST

शंकरबाबांच्या लाजवंतीसाठी दिग्रसचा श्रीराम जोडीदार म्हणून पुढे आला. शनिवारी या दोघांचा विवाह समारंभ थाटात पार पडणार आहे.

अमरावती : शंकरबाबांच्या लाजवंतीसाठी दिग्रसचा श्रीराम जोडीदार म्हणून पुढे आला. शनिवारी या दोघांचा विवाह समारंभ थाटात पार पडणार आहे. तत्पूर्वी गुरुवारी लाजवंतीला हळद-मेहंदी लावण्याचा सोहळा यवतमाळच्या मातोश्री दर्डा सभागृहात पार पडला. लाजवंतीच्या हातावर ‘सखी’ मेहंदी लावत असतानाच शहरातील मान्यवर तिच्या डोईवर आशीर्वादाचे हात ठेवत होते. या सोहळ्याचे यजमानपद लोकमत सखी मंचने स्वीकारले होते. सखी मंच प्रमुख सीमा दर्डा यांनी मायेने या सोहळ्याची जबाबदारी सांभाळली. दुपारी ३ वाजता या सोहळ्यात लाजवंतीचे आगमन झाले. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या पत्नी शीतल राठोड लाजवंतीला घेऊन आल्या. यावेळी सीमा दर्डा यांनी स्वत: पुढे होऊन प्रवेशद्वारातच लाजवंतीचे औक्षण केले. फुलांचा वर्षाव करीत तिला सभागृहात आणले. थोड्या वेळातच वर श्रीरामचे आगमन झाले. मेहंदी नृत्याने केले मंत्रमुग्धअमरावती : सर्व मान्यवरांनी श्रीरामचेही औक्षण करून त्याला सभागृहात आणले. या कार्यक्रमाचे यजमानपद सांभाळणाऱ्या यवतमाळ लोकमत सखी मंचच्या प्रमुख सीमा दर्डा म्हणाल्या, महिलांच्या भावविश्वाला बळ देणारे सखी मंच हे व्यासपीठ आहे. महिला सक्षम झाल्या तरच देश सक्षम होईल. २००१ साली यवतमाळात महानायक अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या हस्ते सखी मंचचे उद्घाटन झाले. एकमेकींचे सुख-दु:ख वाटून घेणे, विकासाकरिता झटणे हाच आमचा उद्देश आहे. लाजवंतीच्या मेहंदी कार्यक्रमाचे यजमानपद मिळणे हे आमचे भाग्य आहे. आम्हा असंख्य भगिनींचा आशीर्वाद कायम लाजवंतीच्या पाठीशी राहील. रेणू शिंदे म्हणाल्या, लाजवंतीच्या भावी आयुष्याला आम्हा सर्व सखींच्या शुभेच्छा आहेत. तर सीमातार्इंमुळे या कार्यक्रमात मलाही खारीचा वाटा उचलता आला, अशी कृतज्ञतेची भावना प्रगती धुर्वे यांनी व्यक्त केली.या मेहंदी सोहळ्याला यवतमाळ लोकमत सखी मंचच्या सदस्यांसह शहरातील अनेक गणमान्य उपस्थित होते. लोकमतचे जिल्हा कार्यालयप्रमुख किशोर दर्डा, प्राचार्य प्रकाश नंदूरकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, लव दर्डा, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे, सुरेश राठी, प्रशांत बनगीनवार, सीमा दर्डा, सोनाली दर्डा, पालकमंत्र्यांच्या पत्नी शीतल राठोड, लिना नंदूरकर, रेणू शिंदे, प्रगती धुर्वे, वीरेंद्र अग्रवाल, दुर्गा अग्रवाल, अजय मुंधडा, दत्ता देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.एकीकडे लाजवंती आणि श्रीराम या उपवर वधू-वरांना मेहंदी लावून देण्यात ‘सखी’ मग्न होत्या, तर त्याचवेळी मंचावर मधुर गीतांची मैफल रंगली होती. नटराज संगीत कला अकादमीच्या चमूसोबत सखी मंचच्या सदस्यांनी एकापेक्षा एक सरस गीतरचना सादर केल्यात. याचवेळी माला, लक्ष्मी, गांधारी, मंजूळा, रूपा या लाजवंतीच्या काही मैत्रिणीही आवर्जून उपस्थित झाल्या. वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या अनाथालयात वाढलेली लाजवंती आज अनेक नातेवाईकांच्या गर्दीत हरखून गेली होती. संसारीक जीवनात पदार्पण करताना तिच्या मनात उसळणाऱ्या भावनांना सखी मंचच्या सदस्या आपल्या गीतांतून फुलवत होत्या. ‘आये हो मेरी जिंदगी मे तुम बहार बन के’ हे गाणे म्हणजे लाजवंतीच्याच मनाचे बोल होते. सखी मंचच्या अपर्णा शेलार, लीना कळसपूरकर, मीनल ढोणे, वर्षा पडवे, अपर्णा वासनिक, विद्या बेहरे, दीपिका गंगमवार, अमृता कामडी, प्रिती उपलेंचवार, प्राजक्ता हांडवे, कविता डोंगरे यांच्या स्वरांनी लाजवंतीच्या मेहंदी कार्यक्रमाला खरा आनंदाचा रंग चढविला. या गीतांना उत्तम साथ संगत दिली ती नटराज संगीत कला अकादमीच्या चमूने. त्यात किशोर सोनटक्के, बाबा चौधरी, आनंद बिसमोरे, प्रवीण मानकर, प्रकाश कुमरे, मुकुंद शेंडे यांचा समावेश होता. दरम्यान यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या मेहंदी नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. नाचता-नाचता या चिमुकल्या नर्तकींनी लाजवंती व श्रीराम या उपवर जोडप्यापुढे जाऊन ‘मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना’ असे मोहक आर्जवही केले. विश्लाक्षी राखडे, आकांक्षा जऊळकर, विशाखा खेतान, अनुजा चिंतावार, आर्या तोटे, पूर्वा दवे, सानिया सोधी, स्वरा वाढवे या विद्यार्थिनींना यश बोरुंदिया यांचे नृत्यदिग्दर्शन लाभले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री पंडित यांनी केले.मांडव नव्हे, माहेर अन् पाहुण्यांचा आहेरमातोश्री दर्डा सभागृह लाजवंतीच्या मेहंदी सोहळ्यासाठी मांडव बनले होते. या मांडवात मान्यवर पाहुण्यांनी लाजवंतीच्या संसारासाठी म्हणून आहेर केला. सोनाली लव दर्डा यांनी साडी सप्रेम भेट दिली. जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे आणि प्रगती धुर्वे या दाम्पत्याने लाजवंतीला गॅस कनेक्शन दिले. कुणी सुटकेस व इतर गृहोपयोगी वस्तू तर कुणी रोख रक्कमही दिली. या रोख रकमेचा लाजवंतीच्या नावे ‘एफडी’ करण्यात येणार आहे.