अमरावती : दिवंगत नेते रा.सू.गवई यांचे स्मारक उभारण्याबाबत समितीची बैठक पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली.बैठकीस न्या.भूषण गवई, आ.सुनील देशमुख, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मनपा आयुक्त हेमंत पवार, पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी आदी अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.स्मारक संकुल उभारणीचे काम शासनाच्या प्रचलित नियमानेच प्रमाणेच करण्यात येईल. आर्किटेक्ट नेमून स्मारक संकुलाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येईल. सदरचे अंदाजपत्रक मागवून त्यास लागणाऱ्या निधीची पूरक मागणी त्वरित करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री पोटे आणि न्या.भूषण गवई यांनी स्मारक संकुलासंदर्भात उपयुक्त सूचना केल्या. या स्मारकाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २५ जुलै रोजी होणार आहे. दादासाहेबांचे जन्मगावी दारापूर येथे २५ जूलै रोजी दुपारी १२ वाजता दारापुर अभियांत्रिकीच्या परिसरात भदन्त ज्ञानज्योती महास्थवर यांच्या उपस्थितीत सुमनांजली अर्पीत करण्याचा कार्यक्रम होणार आहे. अशी महिती श्रमीक पत्रकार भवन येथे शनिवारी पार पडलेल्या पत्रपरिषदेत देण्यात आली. परिषदेला रिपाईचे नेते रामेश्वर अभ्यंकर, भैयासाहेब गवई, भाऊसाहेब ढंगारे, भुषण बन्सोड, हिम्मत ढोले, अमोल इंगळे आदीनी दिली. (प्रतिनिधी)
दादासाहेब गवई स्मारक समितीची बैठक
By admin | Updated: July 24, 2016 00:10 IST