मोर्शी : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या मोर्शी शाखेची सभा १७ जानेवारीला नुकतीच झाली. .या सभेच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब कडू होते. प्रमुख निवडणूक निरीक्षक प्रफुल्ल ढोरे, नरेंद्र ठाकरे, ज्योती उभाड, युवराज मालखेडे होते. सत्र २०२०-२१ मध्ये निवृत्त झालेल्या सर्व शिक्षकांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. प्रदीप खवले, प्रकाश भोजने, प्रकाश पाथरे, लंगडे, मडघे, गटशिक्षणाधिकारी सुखदेवराव बडवाईक, साहेबराव पखाले यांचा यामध्ये समावेश होता. बाबासाहेब ठाकरे, अनिल देशमुख, मदन उमक, प्रकाश पाथरे, सुखदेवराव बडवाईक, ज्योती उभाड यांनी मार्गदर्शन केले. अण्णासाहेब कडू यांनी अध्यक्षीय भाषणात शिक्षक संघाचा प्रगतीचा आलेख उपस्थितांसमोर मांडला. या सभेत शिक्षक बँक निवडणुकीकरिता उमेदवारांची प्राथिमक निवड करण्यात आली.याप्रसंगी अतुलभाऊ नितनवरे, गोटे, मालगे यांची विशेष उपस्थिति होती. प्रास्ताविक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक निळकंठराव यावले यांनी केले. संचालन सरचिटणीस गजाननराव चौधरी व आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष गणेश जोशी यांनी केले.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:12 IST