शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आजारी अवस्थेतही महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पुरविली आरोग्यसेवा !

By admin | Updated: November 30, 2015 00:24 IST

प्रकृती नादुरूस्त असताना आणि सलाईनद्वारे उपचार सुरू असतानासुध्दा एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने रविवारी रुग्णांना आरोग्य सेवा पुरविली.

अमरावती : प्रकृती नादुरूस्त असताना आणि सलाईनद्वारे उपचार सुरू असतानासुध्दा एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने रविवारी रुग्णांना आरोग्य सेवा पुरविली. मनुष्यबळाअभावी असा प्रसंग जिल्हा सामान्य रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी सुनीता मेश्राम यांच्यावर ओढवला. जिल्हाभरातील गोरगरिब रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्याची जाबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालयावर आहे. येथे दररोज हजारो रूग्ण उपचारार्थ येतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून मनुष्यबळाच्या अभावाने आरोग्यसेवेत अडचणी निर्माण होत आहे. रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो. रविवारी सुध्दा मनुष्यअभावी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. महिला वैद्यकीय अधिकारी सुनीता मेश्राम यांची प्रकृती बिघडली असतानाही त्यांना रूग्णांना आरोग्य सेवा पुरवावी लागली. सुनीता मेश्राम यांची शनिवारी ड्युटी होती. दरम्यान उलट्यांचा त्रास सुरु झाल्याने अशक्तपणा आला होता. याबाबत त्यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक अशोक वनकर यांच्याकडून सुटी घेतली होती. मात्र, वेळेवर अन्य डॉक्टर्स कसे येणार? आणि रूग्णांना सेवा कोण पुरविणार, असा प्रश्न वनकर यांच्यासमोर उभा ठाकला. त्यामुळेत्यांची रजा नामंजूर झाली. परिणामी मेश्राम यांना आजारी अवस्थेत रुजू व्हावे लागले. अशाच अवस्थेत त्यांनी दुपारपर्यंत रुग्णांना आरोग्य सेवा पुरविली. (प्रतिनिधी) मनुष्यबळाचा अभाव, रजा झाली नामंजूर : जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकारउलट्यांचा त्रास होत असल्यामुळे अशक्तपणा आला होता. त्यामुळे सलाईन घेत आरोग्यसेवा पुरवावी लागली. जिल्हा सामान्य रूग्णालयात पुरेसे मनुष्यबळ नसल्याने सुटी मिळू शकली नाही. - सुनीता मेश्राम, वैद्यकीय अधिकारी. वैद्यकीय अधिकारी सुनीता मेश्राम यांनी प्रकृती बिघडल्याने त्यांनी सुटी मागितली होती. मात्र, वेळेवर अन्य डॉक्टर नसल्याने त्यांना रजा दिली नाही.- अशोक वणकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक.