शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सुपरस्पेशालिटिसह पाच ठिकाणी लवकरच मेडिकल ऑक्सिजन निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:11 IST

अमरावती : विभागीय संदर्भ रुग्णालय (सुपरस्पेशालिटी) व जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील काही उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये अशा पाच ठिकाणी ...

अमरावती : विभागीय संदर्भ रुग्णालय (सुपरस्पेशालिटी) व जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील काही उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये अशा पाच ठिकाणी वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीच्या कामाला गती देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मेळघाटातील धारणीसह पाच ठिकाणी वैद्यकीय दर्जाचा प्राणवायू निर्माण होऊन गरजू रुग्णांसाठी त्याचा उपयोग होईल, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी सांगितले.

कोरोना साथ लक्षात घेता पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध कामांना गती दिली. कोरोना रुग्णांवरील उपचारादरम्यान ऑक्सिजनची गरज पूर्ण व्हावी म्हणून कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ई- टेंडर प्रक्रिया करण्यात आली होती. ती प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता प्रकल्प निर्मिती चालना मिळाली आहे. ना. ठाकूर यांनी दूरदृष्टी ठेवून हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी निर्देश दिले व प्रकल्प निर्मितीसाठी पालकमंत्र्यांनी वेळोवळी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने प्रकल्प निर्मिती कार्याला वेग आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच रुग्णांना तातडीने प्राणवायू उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा कोविड रुग्णालयासह पाच ठिकाणी प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसाला २५९ ऑक्सिजन सिलिंडर निर्मिती होणार आहे. ऑक्सिजन निर्मिती केंद्राची उभारणी होत असल्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भरून निघणार आहे.

बॉक्स

शासकीय रुग्णालयांना दिलासा

विभागीय संदर्भ रुग्णालयातील जिल्हा कोविड रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, धारणी उपजिल्हा रुग्णालय, तिवसा ग्रामीण रुग्णालय, नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालय याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्राणवायू निर्मिती केंद्रात अनुक्रमे ८८ ऑक्सिजन सिलिंडर, ५८ सिलिंडर, ४४ सिलेंडर, १९ सिलिंडर, १९ सिलेंडर व ३१ सिलिंडर असे एकूण २५९ ऑक्सिजन सिलिंडर निर्मिती होणार आहे.

बॉक्स

जागतिक मापदंडानुसार होणार उभारणी

प्राणवायू प्रकल्प निर्मिती ही जागतिक आरोग्य संस्था यांनी ठरवून दिलेल्या मापदंडानुसार व मार्गदर्शक सूचनेनुसार केली जाणार आहे. मेडिकल ग्रेड ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी आवश्यक इन्टास्टलेशन, मेंटेनन्स, ऑक्सिजनचे उत्पादन ठरलेल्या स्टँडर्डनुसार केल्या जाणार आहे.

बॉक्स

अशी आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये

- उत्कृष्ट दर्जाचा वैद्यकीय प्राणवायू होणार उपलब्ध

- आठवड्यातील सातही दिवस होणार निर्मिती

- हाय टेम्परेचर, हाय किंवा लो प्रेशर, लो ऑक्सिजन, रिझर्व्ह सोर्स ॲक्टिव्ह होणे याबाबत मिळणार अलार्मद्वारे सूचना

- ऑक्सिजन उत्पादन, आऊटपुट प्रेशर, सिस्टम स्टेटसबाबत डिजिटल डिस्प्लेद्वारे मिळेल सूचना

- ऑक्सिजन उत्पादन सनियंत्रणासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

- जागतिक मापदंडानुसार होणार उभारणी