अमरावती : सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीत संजय खोडके यांच्या वर्चस्वातील राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट गटाचाच वरचष्मा राहील, असे राजकीय वातावरण महापलिकेत निर्माण झाले आहे. काँग्रेसनेसुद्धा महापौर पदासाठी दोन पाऊल मागे जाण्याची सकारात्मक भूमिका घेतल्याने महापालिकेत आघाडीचीच सत्ता कायम राहील, असे चित्र आहे.महापौर पद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून त्यानुसारच निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. महापौर वंदना कंगाले यांचा कार्यकाळ ९ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे. तत्पुर्वी महापौर पदाची निवडणूक होणे आवश्यक असल्याने महापालिका प्रशासनाने विभागीय आयुक्तांना या निवडणुकीची तारीख निश्चित करण्याबाबतचे पत्र पाठविले आहे. विभागीय आयुक्तांकडून सोमवारी या निवडणुकीबाबत पत्र येण्याचे संकेत आहेत. ५ सप्टेंबर रोजी महापौर पदाची निवडणूक घेण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. मात्र महापौर पद कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाईल, हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
महापौरपद खोडके गटाकडेच!
By admin | Updated: August 30, 2014 23:20 IST