१४ वे महापौर : ५ सप्टेंबर रोजी निवडणुकीची शक्यतांअमरावती : येथील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज शनिवारी काढण्यात आली. यात महापौर पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलांसाठी जाहीर झाले. येत्या ५ सप्टेंबर रोजी महापौर पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.सध्याचे महापौर पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. महापौर पदी वंदना कंगाले या विराजमान आहेत. त्यांच्या पदाचा कार्यकाळ ९ सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी महापौर पदाची निवडणूक होणे अपेक्षित आहे. आज शनिवारी मुंबई मंत्रालयात नगरविकास मंत्री उदय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील २६ महापालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यात अमरावतीचे महापौर पद सर्वसाधारण महिलांकरिता जाहीर झाले. महापौर पदाची निवडणूक ५ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहाचा काँग्रेसला लाभ महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. महापौर व उपमहापौर निवडीच्यावेळी या दोन्ही पक्षात झालेल्या करारानुसार यावेळी महापौर पद राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे दोन शकले पडलीत. दोन्ही गटाचे स्वतंत्र गटनेते झाले. हा वाद आता न्यायप्रविष्ट आहे. याचाच लाभ काँग्रेसला मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चीली जात आहे.
महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी
By admin | Updated: August 16, 2014 23:13 IST