शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

महापौर, उपमहापौरपदाचे नामांकन

By admin | Updated: September 6, 2014 01:26 IST

येत्या ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी प्रत्येकी ८ सदस्यांनी शुक्रवारी नामांकन अर्ज सादर केले आहे.

अमरावती : येत्या ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी प्रत्येकी ८ सदस्यांनी शुक्रवारी नामांकन अर्ज सादर केले आहे. नामांकन अर्ज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांपर्यत दाखल करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट यांच्यात आघाडी होण्याची दाट शक्यता आहे.महापौर पदाकरीता भाजपच्या हेमलता साहु, मंजुषा जाधव तर शिवसेनेच्या रेखा तायवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सपना ठाकूर, जयश्री मोरय्या, बसपाच्या गुंफाबाई मेश्राम, हमीदाबी शेख अफजल चौधरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या चरणजित कौर नंदा या ८ महिला सदस्यांनी नामांकन दाखल केले आहे. उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार, भाजपचे चंदुमल बिल्दाणी, छायाताई अंबाडकर, जनविकास काँग्रेसचे बाळासाहेब भुयार, नितीन देशमुख, शिवसेनेचे प्रशांत वानखडे, बसपाचे दीपक पाटील तर राष्ट्रवादी कॉग्रेस फ्रंटचे भूषण बनसोड यांनी नामांकन अर्ज सादर केले आहे.खोडके गटाच्या सदस्यांची बैठकमहापौर, उपमहापौर निवडणुकीच्या अनुषंगाने संजय खोडके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या १६ सदस्यांची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत महापौर पदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला संजय खोडके, सुलभा खोडके, अविनाश मार्डीकर, चरणजित कौर नंदा, जयश्री मोरे, हमीदा बानो शेख अफजल चौधरी, हमीद शद्दा, आसीफ हुसैन, मो. इमरान, ममता आवारे, सारीका महल्ले, सादीक आयडिया, वंदना हरणे, निलीमा काळे, मिलिंद बांबल, जावेद मेमन आदी उपस्थित होते.