शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महापौर, आयुक्तांची लसीकरण केंद्रांना भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:12 IST

अमरावती : महापौर चेतन गावंडे व आयुक्त प्रशांत रोडे यांनी बुधवारी शहरातील आयसोलेशन दवाखाना व मोदी हॉस्पिटलला भेट दिली. ...

अमरावती : महापौर चेतन गावंडे व आयुक्त प्रशांत रोडे यांनी बुधवारी शहरातील आयसोलेशन दवाखाना व मोदी हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचारी व नागरिकांशी संवाद साधला. आपली काळजी घेण्‍याच्‍या सूचना दिल्‍या. आशा वर्कर यांच्‍याशी यावेळी चर्चा केली. लसीकरणाची माहिती जाणून घेतली. गृहभेटी दरम्यान लसीकरणाचीही माहिती घ्यावी तसेच लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्‍साहित करण्याची सूचना केली. १ एप्रिलपासून ४५ वर्षे पूर्ण झालेल्‍या नागरिकांचेही लसीकरण करण्‍यात येत आहे. ज्‍या नागरिकांची नोंदणी होत नसेल त्‍यांनी केंद्रावर जाऊन नोंदणी करून लसीकरणाचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन त्‍यांनी केले. केंद्र शासनाचा ११ एप्रिलपासून लस महोत्‍सव सुरू झाला असून, अधिकाधिक नागरिकांना लस देण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येत आहे. लस केंद्रावर नागरिकांनी नोंद करून लस घ्‍यावी. त्‍यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी एकप्रकारे मदतच होणार आहे. यावेळी सभागृहनेता तुषार भारतीय, नगरसेवक राजेश साहू, बलदेव बजाज, शहर अभियंता रवींद्र पवार, डॉ. देवेंद्र गुल्‍हाणे, डॉ. शारदा टेकाडे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, उद्यान अधीक्षक मुकुंद राऊत, उपअभियंता श्रीरंग तायडे, अभियंता लक्ष्‍मण पावडे उपस्थित होते.

बॉक्स

पंचसूत्रीशिवाय पर्याय नाही

मास्‍क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर, चाचणी व लसीकरण ही पंचसूत्री पाळल्‍याशिवाय पर्याय नाही ते सर्वांनी पाळायलाच पाहिजे. शहरात लसीकरण केंद्र तयार करण्‍यात आले असून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी त्‍वरित लस घेऊन या महोत्‍सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त प्रशांत रोडे यांनी यावेळी केले.