शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
4
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
5
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
6
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
7
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
8
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
9
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
10
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
11
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
12
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
13
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
14
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
15
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
16
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

‘जेट पॅचर’च्या कामावर महापौर नाराज

By admin | Updated: September 28, 2015 00:28 IST

महापालिकेने दोन वर्षांपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी अत्याधुनिक नुझिलँड पॅटर्न ‘जेट पॅचर’ प्रणाली लागू केली.

देयके रोखण्यासाठी आयुक्तांना पत्र: वर्षाकाठी एक कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्हअमरावती : महापालिकेने दोन वर्षांपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी अत्याधुनिक नुझिलँड पॅटर्न ‘जेट पॅचर’ प्रणाली लागू केली. त्यानुसार खड्डे बुजविण्याचे काम सुरू असताना आता या प्रणालीवर महापौर चरणजितकौर नंदा यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून कंत्राटदारांचे देयके रोखण्यात यावे, याकरिता आयुक्तांना पत्र दिले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम युद्धस्तरावर करण्यात आले. गणेश मिरवणूक, विसर्जनाचे मार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘जेट पॅचर’ या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केला. पाचही झोननिहाय रस्ते बुजविण्याचे काम सुरु असताना महापौर चरणजित कौर नंदा यांनी जेट पॅचर कंत्राटदाराचे देयके अदा करण्यावर आक्षेप नोंदविला आहे. खड्डे बुजविणारी जेट पॅचर कंपनी ही नागपूर येथील असून खड्डे न बुजविता दरवर्षी एक कोटी रुपयांचे देयके अदा करण्यावर सभागृहात आक्षेप घेण्यात आला. विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर यांनी काम निकृष्ट केल्याची बाब उपस्थित केली. मात्र या मुद्दावर प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे हरमकर यांनी जेट पॅचरच्या कामाबाबत महापौरांकडे तक्रार केली होती. त्यामुळे महापौरांनी जेट पॅचरच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करुन आयुक्तांना सदर कंत्राटदारांची देयके रोखण्यासाठी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना पत्र दिले. महापौरांनी देयके रोखण्यासाठी पत्र देताच याविषयी तर्कवितर्क लावले जात आहे. एक कोटी रुपये खड्डे बुजविण्यासाठी खर्च करण्यात येत असेल तर या खड्ड्यांचे आयुष्य हे किमान दोन वर्षे असणे अपेक्षित आहे. परंतु जेट पॅचरने बुजविण्यात आलेले खड्डे हे निकृष्ट दर्जाचे असून ते लवकरच उखडले, असा आरोप महापौरांनी केला आहे. जेट पॅचरच्या खड्डे बुजविण्यावर आक्षेप घेण्यात आल्यामुळे प्रशासन याप्रकरणी देयकांबाबत कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.