शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत फलकांवर ‘बाजार परवाना’ची माया!

By admin | Updated: July 29, 2016 00:16 IST

शहराचे हृदयस्थान असलेल्या राजकमल चौकात फलकबंदी असताना येथे राजरोसपणे फलके लावली जातात.

अक्षम्य दुर्लक्ष : फलकबंदीबाबत जनजागृतीचा अभाव अमरावती : शहराचे हृदयस्थान असलेल्या राजकमल चौकात फलकबंदी असताना येथे राजरोसपणे फलके लावली जातात. या अनधिकृत फलकबाजांवर बाजार, परवाना विभागाची ‘माया’ असल्याने हा नियमबाह्य प्रकार घडतो आहे. ‘राजकमल चौकात महापौर-उपमहापौरांची फलकबाजी’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच महापौर रिना नंदा आणि उपमहापौर शेख जफर यांची छायाचित्रे असलेली फलके बुधवारी काढून टाकण्यात आली. मात्र, अ‍ॅड एजन्सी वा संबंधितांना दंड ठोठावण्यात आला नाही. त्यामुळे बाजार परवाना विभागातील संबंधितांच्या अनधिकृत फलकबाजांसोबत असलेल्या स्रेहबंधाचा प्रत्यय आला आहे. ‘राजकमल चौकात फलकबंदी’ असा संदेशच लोकांपर्यंत न गेल्याने राजरोसपणे येथे रोज नानाविध फलके लागतात, असा दावा बाजार परवाना विभागाने केला आहे. या भागात बॅनर, होर्डिंग्ज दिमाखाने झळकतात. अ‍ॅड एजन्सीचे कर्मचारीच परस्पर ही फलके राजकमल वा बंदी असलेल्या अन्य ठिकाणी लावण्याची सेवा इमानेइतबारे करतात, असेही उघड झाले आहे. ‘लोकमत’ने महापौर-उपमहापौरांच्या फलकबाजीवर प्रकाशझोत टाकल्यानंतर राजकमल चौकात बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणारे फलके लावण्यात आली. ती फलके काढून टाकण्याची वा दंड ठोठावण्याची सद्बुद्धी बाजार व परवाना विभागाला बुधवारी सुचली नाही. होर्डिंग्जही नियमबाह्य शहराला फलकांबरोबरच अनधिकृत जाहिरात होर्डिंग्जचा विळखा बसला आहे. व्यावसायिक संकुले, मोठ्या इमारती आणि चौकाचौकात विना परवानगी होर्डिंग्ज उभारल्या गेले आहेत. यातील नेमक्या किती होर्डिंग्जकडे परवानगी आहे, याची माहिती बाजार व परवाना विभागाला नाही. शहरातील बहुतांश जाहिरात एजंसीज् विना परवानगी होर्डिंग्ज उभारून लाखोंचा कर बुडवित असतानाही प्रशासनाने या व्यावसायिकांविरुद्ध कुठलीही कारवाई केलेली नाही. राजकमल चौकातील अनधिकृत बॅनर्स हटविण्याचे निर्देश अधिनिस्तांना दिले आहेत. परवानगी नसलेल्या स्थळी फलक लावणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. राजेंद्र दिघडे, अधीक्षक बाजार व परवाना विभाग कारवाईचा धडाका हवा एखाद्या ट्यूशन क्लासधारक किंवा अ‍ॅड एजन्सीविरोधात फौजदारी नोंदवून स्वत:ची पाठ थोपटून घेतल्या जाते. पुढे परिस्थिती ‘जैसे थे’ होते. त्यामुळे अनधिकृत फलकबाजांवर वचक राहण्यासाठी धडक कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे.