शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड वाटप प्रकरणाचा मुद्दा तापला

By admin | Updated: April 21, 2015 00:09 IST

शहरात आरक्षित जागा विकसित करण्याचा प्रस्ताव हा प्रशासनाचा असताना नगरसेवक या जागा विकत असल्याचे चित्र रंगविले जात आहे.

सदस्य आक्रमक : आता होऊ द्या ‘दूध का दूध, पानी का पानी’अमरावती : शहरात आरक्षित जागा विकसित करण्याचा प्रस्ताव हा प्रशासनाचा असताना नगरसेवक या जागा विकत असल्याचे चित्र रंगविले जात आहे. एकाही नगरसेवकांनी आरक्षित जागा देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला असेल तर त्यांचे सदस्यत्त्व रद्द करा. मात्र, भूखंड वाटपप्रकरणी सत्यता नागरिकांपर्यंत पोहोचवा, आता होऊ द्या ‘दूध का दूध, पानी का पानी’ असे म्हणत नगरसेवक कमालीचे आक्रमक झालेत. भूखंड वाटपावरुन प्रशासनाची कानउघाडणी करताना यात दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली.सोमवारी पार पडलेल्या आमसभेत भूखंड आरक्षणाचे समायोजनाचा विषय चांगलाच गाजला. आरक्षित जागा विकसित करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. त्यानुसार कार्यवाही करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र, जागा आरक्षणाच्या आड नगरसेवकच या जागा विकत असल्याचा संदेश शहरात पोहोचविला जात असल्याचा आरोप विलास इंगोले, प्रवीण हरमकर, अविनाश मार्डीकर, बबलू शेखावत, प्रशांत वानखडे, प्रदीप दंदे, प्रकाश बनसोड, प्रदीप बाजड, अर्चना इंगोले, संगीता वाघ, चेतन पवार, अरुण जयस्वाल, अमोल ठाकरे, अजय गोंडाणे, तुषार भारतीय, सुनील काळे, दिगंबर डहाके, संजय अग्रवाल, भूषण बनसोड आदींना केला. (प्रतिनिधी)आयुक्तांचे चरित्र जणू ‘यू आर डिक्टेटर’महापालिका आयुक्त गुडेवार यांचे चरीत्र जणू ‘यू आर डिक्टेटर’ अशी भूमिका रंगविली जात आहे. नगरसेवकविरुद्ध आयुक्त असा वाद सुरु झाल्याचे भासविले जात असून कोणीही आकसपूर्ण किंवा द्वेषपूर्ण कर्तव्य करीत नसल्याची बाब प्रदीप दंदे यांनी उपस्थित केली. महापालिकापुरते सिमीत न राहता नगरविकास विभागाचे सचिव होवून राज्यभरात गुडेवार पॅटर्न राबवावा, असा सल्ला प्रदीप दंदे यांनी आयुक्तांना दिला.मी आहे काय, गोल्डन गँगचा सदस्य?भूखंड वाटप अथवा जागा आरक्षण विकसित करण्यावरुन प्रशासनाची लक्तरे सदस्य वेशीवर टांगत असताना यापुढे आरक्षित जागा विकसनात पारदर्शकता आणली जाईल, अशी ग्वाही आयुक्त गुडेवार यांनी दिली. चर्चेदरम्यान पुन्हा सदस्यांमधून गोल्डन गँग हा शब्दप्रयोग करण्यात आल्याने आयुक्त गुडेवार यांनी ‘मी आहे काय, मेंबर’ असे म्हणत यापुढे भूखंड आरक्षण विकसित करताना पारदर्शकता आणण्यासाठीच विषय पत्रिकेवरील प्रस्ताव मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.