मोर्शी : राज्याच्या शिक्षण विभागाने १० ते १५ वर्षांपासून गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची भरती केलेली नाही. यामुळे अनेक शाळांमध्ये गणित तसेच विज्ञान शिकविणाऱ्या शिक्षकांची वानवा आहे.
इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनात गणिताचे महत्त्व कळावे, यासाठी सर्वच शाळांमध्ये गणित हा विषय विद्यार्थ्यांना अनिवार्य करण्यात आला. त्याचप्रमाणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे विषय शिकवले जातात. पण, १० ते १५ वर्षांपासून राज्याच्या शिक्षण विभागाने गणित व विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची भरती न केल्यामुळे शाळेत कार्यरत आहेत. या शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान शिकविला जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. तालुक्यातील काही खासगी शाळेत गणित व विज्ञान विषय शिकवणारे शिक्षक सेवानिवृत्त झाल्यामुळे त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या शिक्षकांनी गावातील बेरोजगार असलेल्या युवकांची नियुक्ती करून विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होऊ नये म्हणून करारावर शिक्षकांची नेमणूक केली असून, सदर शिक्षक विद्यादानाचे कार्य करीत आहेत.