हवामानतज्ज्ञांचा अंदाज : अनेक ठिकाणी पाऊसअमरावती : पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्राकार वारे असून ग्वालियर मार्गे बिकानेरपर्यंत मान्सुनची ट्रॅफ कार्यरत आहे. त्यातच महाराष्ट्र ते केरळ कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. या स्थितीमुळे बुधवारी अतिवृष्टीचे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे. हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते बंगालच्या उपसागरावर हवेचा दाब कमी आहे, नैऋृ ज्ञ उत्तरप्रदेशवर चक्राकार वारे आणि गुजरातपर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी सोमवार व मंगळवारी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच बुधवार आणि गुरुवारी सार्वत्रिक पाऊस व विदर्भातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत कमीअधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आठवडाभर पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने अतिवृष्टीचे संकट घोंघावू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. कमी दाबाचे क्षेत्र, चक्राकार वारे, द्रोणीय स्थितीमुळे सोमवार व मंगळवारी बऱ्याच ठिकाणी सर्वसाधारण पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. बुधवार व गुरूवारी सार्वत्रिक पाऊस असून विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. -अनिल बंड, हवामान तज्ज्ञ.
बुधवारी मुसळधार
By admin | Updated: August 2, 2016 00:04 IST