शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात मुसळधार; अनेक मार्ग बंद

By admin | Updated: August 5, 2015 00:29 IST

मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मेळघाटातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

चिखलदरा : मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मेळघाटातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले दुथडी भरुन वाहत असून चिखलदरा तालुक्यातील अनेक मार्ग बंद झाल्याचे वृत्त आहे.चिखलदऱ्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ५४.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. चिखलदरा-घटांग मार्गावरील जामून नाला येथील पुलावरुन पाणीवाहत असल्याने हे मार्ग बंद झाला. काटकुंभ-गांगरखेडा येथील खुर्शीनदी दुधडी भरुन वाहू लागल्याने हा मार्ग दुपारपर्यंत बंद होता. परतवाडा-धामणगाव मार्ग चिखलदरा मार्ग सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद होता.मंगळवारी दिवसभऱ्यात १७५ मि.मी.मंगळवारी सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुसळधार पावसामुळे चिखलदरा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. चिखलदऱ्याची स्थित अप्पर प्लेटो येथील जलमापन केंद्रावर सायंकाळी ६ वाजेपर्यंत १७५ मि.मी. पावसाची नोंद झाली. एकूण ७७१ मि.मी. पाऊस आज तारखेपर्यंत झाला आहे. रात्री उशिरापर्यंत सतत पाऊस सुरू होता. या संततधार पावसामुळे ढगफुटीची अनुभूती चिखलदरावासीयांना झाली. कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यतापूर्व मध्यप्रदेश आणि लगतच्या विदर्भावरील ठळक कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होऊन त्याचे रुपांतर ‘डीप्रेशन’मध्ये झाले आहे. ते पूर्व मध्यप्रदेश आणि छत्तीसगड जवळपास स्थिरावले आहे. (जबलपूरवरुन ७५ कि.मी. वर) हे वादळ पश्चिम, दक्षिण, पश्चिम (नैर्ऋत्य) दिशेने सरकत असून हळूहळू याची तीव्रता कमी होऊन त्याचे रुपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. मान्सूनची धुरा भटींडा, दिल्ली, ग्वालीयर, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड मार्गे बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पंजाब आणि सभोवताल ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे आहेत. यामुळे विदर्भात काही ठिकाणी ४ आॅगस्ट रोजी अतिवृष्टीची शक्यता आहे. ५ आॅगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊ स पडण्याची शक्यता असल्याचे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.