शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेची गळा आवळून हत्या

By admin | Updated: September 27, 2016 02:54 IST

अकोल्यातील घटना; पतीसह सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा.

अकोला, दि. २६- खेडकर नगरमधील रॉयल पॅलेस येथील विवाहितेने आत्महत्या केल्याचा बनाव रविवारी दुपारी करण्यात आला होता; मात्र विवाहितेने आत्महत्या केली नसून तिची पती व सासरच्या मंडळींनी गळा आवळून हत्या केल्याचा गुन्हा सोमवारी दुपारी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी दाखल केला. या हत्या प्रकरणातील आरोपी पती योगेश वडतकर याला पोलिसांनी अटक केली असून मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.अंजनगाव तालुक्यातील चौसाळा येथील रहिवासी अलका मदनराव काळमेघ यांची सर्वात मोठी मुलगी अम्रिता ऊर्फ राणी हिचा विवाह ७ नोव्हेंबर २00९ रोजी अंजनगाव तालुक्यातीलच चिंचोली येथील रहिवासी तसेच दहीहांडा येथील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले योगेश मधुकरराव वडतकर याच्याशी झाला होता. अम्रिताचे पती योगेश वडतकर, सासरे मधुकरराव वडतकर, सासू सुशीला मधुकरराव वडतकर तसेच तीन नणंद सुनीता कडू, मंजू मेघे, आशा बारब्दे या सातत्याने पैशासाठी तिचा छळ करीत होते व वेळोवेळी आईकडून पैसे घेऊन ये, असा दबाव आणून तिला नेहमी मारहाण करीत होते. अम्रिताने अनेकदा हा प्रकार तिची आई अलका काळमेघ, लहान बहिणी अंकिता टेकाडे व श्रद्धा अतकरे यांना भ्रमणध्वनीवर सांगितला; मात्र पती-पत्नीमधील वाद आज ना उद्या ठीक होतील या आशेने तिची आई अम्रिताला समजावून सांगत होती; मात्र २५ सप्टेंबर रोजीअम्रिताने आत्महत्या केल्याचे योगेशने अम्रिताच्या परिवारला सांगीतल्यावर सर्वांंना धक्का बसला योगेशयाने रविवारी दुपारी अम्रिताला एका खासगी रुग्णालयात आणले; मात्र डॉक्टरांनी रुग्णवाहिकेतच तिची तपासणी करून तिला मृत घोषित केले होते. यानंतर योगेश मृतदेह सोडून निघून गेला. दरम्यान अम्रिताच्या नातेवाइकांनी तिला सवरेपचार रुग्णालयामध्ये दाखल केले यावेळी तिचा डेंग्यूचा आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे योगेशने अम्रिताच्या माहेरच्यांना सांगितले; मात्र माहेरच्यांनी त्याच्यावर विश्‍वास न ठेवल्याने हे खून प्रकरण उघड झाले. सोमवारी योगेश वडतकर व त्याचे आई-वडील आणि तीन बहिणींनी अम्रिताचा गळा आवळून खून केल्याची तक्रार अलका काळमेघ यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये केली. या प्रकरणी पोलिसांनी अम्रिताचा पती योगेश वडतकर, सासरे मधुकरराव वडतकर, सासू सुशीला मधुकरराव वडतकर तसेच नणंद सुनीता कडू, मंजू मेघे, आशा बारब्दे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0२, ४९८ अ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करून अम्रिताचा पती योगेश वडतकारला अटक केली. विवाहिता गोल्ड मेडलिस्टयोगेश वडतकर यांची पत्नी अम्रिता वडतकर ही एम. ए. इंग्लिश आहे. अमरावती विद्यापीठातून ती एम. ए. इंग्लिशमध्ये गोल्ड मेडालिस्ट असून तिच्या मृत्यूच्या दिवशीच खंडेलवाल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्तीपत्र मिळाल्याची माहिती आहे. एका खासगी शिकवणी वर्गामध्येही अम्रिताने विद्यार्थ्यांंंना शिक्षणाचे धडे दिले आहेत.पतीचे विवाहबाहय़ संबंधयोगेश वडतकर हे दहीहांडा येथील कनिष्ठ महाविद्यालयावर प्राध्यापक असून त्यांचे विवाहबाहय़ संबंध असल्याचा आरोप अम्रिताच्या दोन्ही बहिणींनी केला आहे. योगेश वडतकर हे दुसर्‍या स्त्रीला घरात आणण्यासाठी अम्रितावर दबाव आणत असत. एवढेच नव्हे तर याच प्रकारावरून दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी प्रचंड वाद झाला होता.