शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

चार महिन्यांपासून विवाहित जोडपे बेपत्ता

By admin | Updated: September 8, 2016 00:20 IST

संजय गांधी नगरातील रहिवासी सचिन सिमोलिया हा चार महिन्यापासून बेपत्ता असून ...

पोलीस आयुक्तांना निवेदन : रिपाइंचे पोलीस पेट्रोल पंपसमोर आंदोलनअमरावती : संजय गांधी नगरातील रहिवासी सचिन सिमोलिया हा चार महिन्यापासून बेपत्ता असून त्याला शोधण्यास पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भात बुधवारी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने पोलीस पेट्रोल पंपासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले व पोलीस आयुक्तांना मागणीचे निवेदन देण्यात आले.सचिन याने कारंजा लाड येथील रहिवासी शिवानी तुकाराम ढोके हिच्याशी १ एप्रिल २०१६ रोजी आर्य समाज मंदिरात विवाह केला. या विवाहाला मुलीचे वडिल तुकाराम ढोके यांचा विरोध होता. मुलीचे वडिल हे वाशिम जिल्ह्यातील हातेगाव (पूर्णा) येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहे. लग्न झाल्यानंतर शिवानी ढोकेच्या वडिलांनी मुलीला फे्रजरपुरा ठाण्यात मारहाण केली होती तसेच सचिन सिमोलियाला बघून घेण्याची धमकी दिली होती. याप्रकरणानंतर दोघांचाही सुखी संसार सुरळीत सुरु होता. मात्र, २५ मे रोजी शिवानीला फोन करून माहेरी बोलाविण्यात आले. त्यामुळे सचिन व त्याची पत्नी शिवानी हे दोघेही कारंजा लाड येथे गेलेत. त्यानंतर सचिनसोबत कुटुंबीयांचा संपर्कच नाही. सचिनच्या कुटुंबीयांनी त्याची चार दिवस प्रतीक्षा केली, मात्र, अद्याप सचिन घरी परतला नाही. त्यामुळे ३१ मे रोजी सचिनच्या कुटुंबीयांनी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात सचिन हरविल्याची तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांकडे चौकशी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा सचिनच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. सचिन न परतल्याचे पाहून त्याच्या कुटुंबीयांनी कारजा लाड येथे जाऊन शिवानीच्या घरी चौकशी केली. मात्र तिचे घर बंद असल्याचे आढळून आले. शिवानीचे वडिल पोलीस विभागात कार्यरत असल्याने फे्रजरपुरा पोलिसांनी मुलीच्या वडिलांना मदत केल्याचा आरोप सचिनच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप सचिनची आई सविता सिमोलिया यांनी केला आहे. मुलीचे वडिल पोलीस विभागात कार्यरत असल्यानेच या प्रकरणाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत आहे त्यामुळे याप्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करून दोषीवर कायदेशिर कारवाई करण्यात यावी व बेपत्ता सचिनचा शोध घेऊन सविता सिमोलिया यांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपाइंचे जिल्हा संघटक अमोल इंगळे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी दिपक सरदार, मनोज वानखडे, सविता भटकर, देविदास मोरे, आतिष डोंगरे, सदिंप गजभिये, अनिल फुलझेले, सविता सिमोलिया, गौतम मोहोड, गणेश तेलगोटे यांच्यासह आदिचा सहभाग होता.