शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेवानेच लावून दिले वाग्दत्त वधूचे प्रियकरासोबत लग्न

By admin | Updated: June 19, 2017 00:06 IST

मोठ्या थाटामाटात वरातीसह इंदूरहून येथे आलेल्या नवरदेवावर पुढाकार घेऊन स्वत:च्या वाग्दत्त वधुचा तिच्या प्रियकरासोबत विवाह लावून देण्याची वेळ आली.

पोलिसांनी घेतला पुढाकार, ठाण्यात शुभमंगल नवरदेव मात्र नवरीविनाच परतला लोकमत न्यूज नेटवर्क मोर्शी : मोठ्या थाटामाटात वरातीसह इंदूरहून येथे आलेल्या नवरदेवावर पुढाकार घेऊन स्वत:च्या वाग्दत्त वधुचा तिच्या प्रियकरासोबत विवाह लावून देण्याची वेळ आली. पालकांच्या दबावाने बोहल्यावर चढण्यास सज्ज असलेल्या मुलीचा पोलिसांच्या साक्षीने विवाह लावून हा नवरदेव मात्र रिक्तहस्तेच इंदूरला परतला. ही घटना रविवारी घडली. दिवसभर शहरात याच घटनेची चर्चा रंगली होती. विस्तृत माहितीनुसार, येथील अयोध्यानगरातील एका कुटुंबाने अकोला येथील विना वडिलांच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी सदर मुलीचा विवाह इंदूर येथील युवकाशी निश्चित केला होता. सर्व तयारीनंतर मोठ्या थाटामाटात १७ जून रोजी म्हणजे शनिवारी साक्षगंध पार पडले. रविवारी त्यांचा विवाह होणार होता. त्यासाठी साबू मंगल कार्यालयात जय्यत तयारीदेखील करण्यात आली होती. मात्र, दरम्यानच्या काळात मुलीच्या प्रियकराने त्याच्या काही सहकाऱ्यांच्या माध्यमातून नवरदेवाला निरोप धाडला. समजूतदारीने मुद्दा हाताळला मोर्शी : तो ज्या मुलीसोबत लग्न करणार आहे, तिच्यासोबत त्याचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध जुळले असल्याचे नवरदेवाला मध्यस्थांमार्फत सांगण्यात आले होते. त्यासाठी काही छायाचित्रे व अन्य पुरावेदेखील प्रियकराने पाठविले होते. त्यामुळे नवरदेवाच्या तोंडचे पाणी पळाले. सांगितलेल्या बातमीत तथ्य असल्याचे लक्षात येताच नवरदेवाने ही बाब गांभीर्याने घेतली. मुलीचे आधीचे प्रेमप्रकरण असल्याने हे लग्न झाले तरी ते यशस्वी होणार नाही, हे त्याने मुलीकडच्या मंडळींसह आपल्या नातलगांनाही समजावून सांगितले. नवरदेवाच्या या भूमिकेमुळे वधूपक्षात खळबळ उडाली. सगळेच तणावात आले. मात्र, नवरदेवाने समजूतदारीने मुद्दा हाताळल्याने दोन्ही पक्ष पोलीस ठाण्यात पोहोचले. मोर्शी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अल्का निकाळजे यांना त्यांनी घटनाक्रम दाखविला. निकाळजे यांनी आशाच्या अकोल्यातील प्रियकरासोबत भ्रमणध्वनीवरून संवाद साधून सर्व प्रकरण समजावून घेतले. त्याने मुलीसोबत असलेले प्रेमसंबंध कबूल करून तिचे कुटुंबीय जबरदस्तीने तिचा विवाह अन्य ठिकाणी करीत असल्याचे त्याने सांगितले. इतकेच नव्हे, तर तो सदर मुलीसोबत लग्न करण्यास तयार असल्याचेही त्याने सांगितले. यानंतर ठाणेदार नंदकिशोर शर्मा यांनी दोन्ही पक्षांची समजूत घालून नवरीच्या प्रियकराला तत्काळ अकोल्याहून मोर्शीला बोलावून घेतले. प्रियकर त्याच्या सहकाऱ्यांसोबत मोर्शीला पोहोचताच मोर्शी ठाण्यातच शेकडोंच्या उपस्थितीत दोघांचा विवाह पार पडला. नवरदेवाने स्वत: पुढाकार घेऊन भावी वधूचा प्रियकरासोबत विवाह लावून दिल्याची ही घटना शहरात कर्णोपकर्णी पडली. त्यानंतर मोर्शी ठाण्यात बघ्यांची गर्दी जमली होती. नववधूसह तिच्या प्रियकराने मोठ्या मनाच्या नवरदेवासह पोलिसांचे आभार मानले. मंगल कार्यालयात शुकशुकाट शहरातील ज्या साबू मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा होणार होता तेथे घटनेनंतर शुकशुकाट दिसून आला तर मोर्शी पोलीस ठाण्याला मात्र मंगल कार्यालयाचे स्वरूप आले होते. शेकडो वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. मुलगी व तिच्या प्रियकराची लग्न करण्याची इच्छा होती. नवरदेवानेही पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांचे लग्न लावून दिले. यामुळे आम्हाला पोलीस ठाण्यात एका लग्नाचे यजमान होण्याची संधी मिळाली. -नंदकिशोर शर्मा, ठाणेदार, मोर्शी