अमरावती : अकोला जिल्ह्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनीवर १४ डिसेंबर २०१९ रोजी पाच नराधमांनी अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणाचा तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करावी व संबंधित ठाणेदारांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाच्यावतीने पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी डीआयजी मकरंद रानडे यांना भेटून तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.सदर विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची गळफास लावून हत्या केली.आरोपींनी पुरावा नष्ट केला. याबाबत चौकशी झाली नाही व आरोपीविरुद्ध गुन्हेसुद्धा दाखल झाले नाही. संबंधित ठाणेदाराने खोटा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची खोलात चौकशी झाली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे आयजींनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मोर्चेकरांची मागणी आहे. शेकडो नागरिकांचा मोर्चा गुरुवारी दुपारी नेहरू मैदान येथून निघाला. विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाबाहेर या प्रकरणाचा निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्व उत्तमराव भैसने, राजाभाऊ हातागडे, दादासाहेब क्षीरसागर, सुरेश स्वर्गे, गणेशदास गायकवाड, सहदेवराव खंडारे, रुपेश खडसे, गणेश कलाने, पंकज जाधव, बबन इंगोले, देवानंद वानखडे, सुधाकर खडसे, रवि वानखडे, गंगा अंभोरे, इंदिरा हातागडेल पार्वती झोंबाडेल प्रकाश वाळसे महेश लोंढे, हरी झोंबाडे, गोपाल हिवराळे आदींनी केले.
विद्यार्थिनीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST
सदर विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची गळफास लावून हत्या केली.आरोपींनी पुरावा नष्ट केला. याबाबत चौकशी झाली नाही व आरोपीविरुद्ध गुन्हेसुद्धा दाखल झाले नाही. संबंधित ठाणेदाराने खोटा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची खोलात चौकशी झाली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे आयजींनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मोर्चेकरांची मागणी आहे. शेकडो नागरिकांचा मोर्चा गुरुवारी दुपारी नेहरू मैदान येथून निघाला.
विद्यार्थिनीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ मोर्चा
ठळक मुद्देआयजींना निवेदन : कडक बंदोबस्त, अकोला जिल्ह्यातील प्रकरण