शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मार्च-एप्रिल सर्वाधिक जागतिक दिनांचे महिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 12:31 IST

दरवर्षी कॅलेंडर वर्षात ‘मार्च-एप्रिल’ जागतिक दिन घेऊन येतात. यात सर्वाधिक जागतिक दिन मार्च महिन्यात साजरे होतात.

अनिल कडूअमरावती : दरवर्षी कॅलेंडर वर्षात ‘मार्च-एप्रिल’ जागतिक दिन घेऊन येतात. यात सर्वाधिक जागतिक दिन मार्च महिन्यात साजरे होतात.वन्यजीवांचे महत्त्व आणि संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा जागतिक वन्यजीव दिन ३ मार्चला असतो. ८ मार्च हा जागतिक महिला दिन, १५ मार्चला जागतिक ग्राहक दिन, १७ मार्चला जागतिक अपंग सहाय्यता दिन, २१ मार्चला जागतिक वनदिन, २२ मार्चला जागतिक जलदिन, २३ मार्च हा जागतिक हवामान दिन असून २४ मार्च हा जागतिक क्षयरोग निवारण दिन, २६ मार्च जागतिक संगीतोपचार दिन, २७ मार्चला जागतिक रंगभूमी दिन साजरे केले जातात. मार्च महिन्यात एकूण नऊ जागतिक दिन येतात. या जागतिक दिनासोबतच ४ मार्च संत गाडगेबाबा जयंती, १० मार्च कवी कुसुमाग्रज व सावित्रीबाई फुले स्मृतिदिन, ११ मार्चला छत्रपती संभाजी राजे बलिदान दिन, १४ मार्च राष्टÑकुल दिन, २३ मार्च क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव शहीद दिन, २९ मार्च राष्टÑीय नौका दिन पाळले जातात. १२ मार्चला यशवंतराव चव्हाण जन्मदिन आहे. खरे तर मार्च महिन्याची सुरूवातच नागरी संरक्षण दिनाने होते. १ मार्चला नागरी संरक्षण दिन, ३ मार्च हा राष्टÑीय ग्राहक दिन संबोधले जाते.मार्च महिन्याप्रमाणेच एप्रिलमध्येही महत्त्वपूर्ण दिवस आहेत. ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिन, १८ एप्रिल जागतिक वारसा दिन, २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन, २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन, २९ एप्रिलला जागतिक नृत्य दिन आहे. मराठी नववर्षाची सुरूवात गुढीपाडवा ६ एप्रिलला असून १३ एप्रिलला श्रीरामनवमी आणि जालियनवाला बाग स्मृतिदिन आहे. १० एप्रिलला डॉ. पंजाबराव देशमुख पुण्यतिथी असून, ११ एप्रिलला महत्मा फुले जयंती आहे, तर १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. याच दिवशी श्री रामदास स्वामी जयंती आणि अग्निशामन दल दिन आहे.१७ एप्रिल श्री महावीर जयंती तर १९ एप्रिल रोजी श्री हनुमान जयंती आणि गूडफ्रायडे आहे. २४ एप्रिल जलसंपत्ती दिन व ३० एप्रिल बालकामगार विरोधी दिन म्हणून पाळला जातो. 

टॅग्स :cultureसांस्कृतिक