शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

अल्पसंख्यक शाळांत आता मराठीचे धडे !

By admin | Updated: May 3, 2015 00:14 IST

अल्पसंख्यकांसाठीच्या अमराठी शाळांतील विद्यार्थ्यांना मराठी शिकविण्यासाठी आता मानसेवी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.

निर्णय : पुढील शैक्षणिक सत्रापासून होणार अंमलबजावणीअमरावती : अल्पसंख्यकांसाठीच्या अमराठी शाळांतील विद्यार्थ्यांना मराठी शिकविण्यासाठी आता मानसेवी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. स्पर्धा परीक्षा, राज्यसेवा परीक्षेतील इतर सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अल्पसंख्याक विद्यार्थी मागे पडत असल्याने सरकारने अस्तित्वात असलेली मराठी भाषा फाउंडेशन वर्ग ही संकल्पना सुधारित स्वरुपात स्वीकारली आहे. २०१५-१६ या वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.अल्पसंख्यक विकास विभागाने ही नवीन पद्धती स्वीकारली आहे. त्यानुसार आता राज्यभरातील अशा अमराठी शाळांमध्ये (इंग्रजी माध्यम वगळून) नवीन पद्धतीने मराठी शाखा शिकविली जाणार आहे. अल्पसंख्यक समूहाच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या १५ कलमी नवीन कार्यक्रमातही यावर भर दिला आहे. राजकीय सेवेत अल्पसंख्याक उमेदवारांचे प्रमाण वाढविण्यासाठी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. मराठी भाषेवर पुरेसे प्रभुत्व नसल्याने राज्य सेवा तसेच स्पर्धा परीक्षांत हे विद्यार्थी तुलनेत मागे पडत आहेत. त्यामुळे सरकारने अल्पसंख्याक शाळांतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २००६ पासून प्रयत्न सुरु केले आहे. कालौघात यातील काही पद्धती निरुपयोगी ठरल्यामुळे नवीन संकल्पनेनुसार आता मानवसेवी तत्त्वावर शिक्षकांची नियुक्ती केली जाईल. शिक्षकांना दरमहा पाच हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यांची नियुक्ती ९ महिन्यांसाठी असणार आहे. त्यानंतर त्यांची सेवा संपुष्टात येऊन नवीन वर्षी नव्याने निवड प्रक्रिया राबविली जाईल. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (निरंतर) यांच्यावरही जबाबदारी सोपविली आहे. मे महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्व उर्दू तसेच मराठी माध्यमेतर शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थी संख्या, तुकड्यांची संख्या सद्यस्थितीत असलेली शिक्षकांची संख्या लक्षात घेऊन शिक्षकांची नियुक्ती केली जाईल. नियुक्तीसाठी अंतिम मान्यता जिल्हाधिकाऱ्यांची घ्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी)अशी असेल शिक्षकांची संख्या१८० ते २०० विद्यार्थ्यांसाठी एक तर ३०० पर्यंतच्या संस्थांसाठी दोन शिक्षक असतील. त्यानंतर प्रत्येक १५० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक नियुक्त करता येईल. बी.एड., एम.एड. अर्हता प्राप्त केलेल्या शिक्षकांची निवड केली जाईल. १ जुलै ते ३१ मार्च या कालावधीसाठी शिक्षकांची नियुक्ती असेल. अशोभनीय वर्तन अथवा सतत गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने शिक्षणाधिकारी नियुक्ती रद्द करु शकतील. या शिक्षकांनी शाळेत शिकवून झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना पुन्हा अतिरिक्त शिक्षकवणी करणे अपेक्षित आहे.तीन वर्षे मराठीचे शिक्षणआठवी, नववी व दहावीसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विहित केलेली व अभ्यासक्रमाची मराठी क्रमिक पुस्तके असतील. या तीन वर्षांत व्याकरण, वाक्यप्रचार, म्हणी, शब्दांच्या जाती, काळ, पत्रलेखन, वृत्तलेखन असे तंत्रशुध्द मराठी शिकविले जाईल. तिमाही चाचणीतून विद्यार्थ्यांची पातळी जाणून घेतली जाईल. निकालाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर होणार आहे. या वर्गासाठीचे हजेरीपत्रक वेगळे राहील. अचानक वर्गांना भेटी देऊन कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी निरंतर शिक्षणाधिकाऱ्यांची असणार आहे.