शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठात हिंदी विभागाचा कारभार मराठीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 16:02 IST

आॅनलाईन लोकमतगणेश वासनिक/अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात हिंदी विभागाचा कारभार मराठी विभागाच्या सहायक प्रमुखांकडे सोपविला आहे. रिक्त पदांच्या ग्रहणामुळे हा अफलातून निर्णय घेण्याची नामुष्की विद्यापीठ प्रशासनावर ओढवली आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एकूण २८ विभाग आहेत. त्यापैकी २४ अनुदानित, तर चार विनाअनुदान तत्त्वावर सुरू आहेत. यामध्ये ३३ प्राध्यापक व प्रथम ...

ठळक मुद्देतासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती,विद्यार्थी संभ्रमातमराठीला रिक्तपदांचे ग्रहण

आॅनलाईन लोकमतगणेश वासनिक/अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात हिंदी विभागाचा कारभार मराठी विभागाच्या सहायक प्रमुखांकडे सोपविला आहे. रिक्त पदांच्या ग्रहणामुळे हा अफलातून निर्णय घेण्याची नामुष्की विद्यापीठ प्रशासनावर ओढवली आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एकूण २८ विभाग आहेत. त्यापैकी २४ अनुदानित, तर चार विनाअनुदान तत्त्वावर सुरू आहेत. यामध्ये ३३ प्राध्यापक व प्रथम ते चतुर्थ श्रेणी २३४ कर्मचाºयांच्या नियुक्तीबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. अद्याप प्रस्तावावर शासनस्तरावर कोणताही निर्णय झालेला नाही. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी रिक्त पदांच्या भरतीबाबत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनादेखील निवेदनाद्वारे अवगत केले. विद्यापीठाला एकूण १३५ प्राध्यापकांची आवश्यकता आहे. याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.आठ महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या हिंदी विभागप्रमुख पदावरून शंकर बुंदिले निवृत्त झाले. त्यांच्यानंतर हिंदी विभागप्रमुखपदाची धुरा कोणाच्या हाती सोपवावी, असा प्रश्न रिक्त पदांमुळे निर्माण झाला होता. विद्यापीठ प्रशासनाचे मराठी विभाग सहायकप्रमुख मोना चिमोटे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. मराठी विभागाकडे हिंदीचा कारभार असल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. विद्यापीठाला हिंदी भाषेच्या जाणकार व्यक्तीकडे या विभागाची धुरा सोपविता न येणे ही बाब आश्चर्यकारक मानली जात आहे.हिंदी विभागात आठ प्राध्यापकांची तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. प्राध्यापकांना विद्यापीठात कायम नोकरीची ‘गॅरंटी’ नाही. त्यामुळे हे प्राध्यापकदेखील ‘टाईमपास’च्या भूमिकेत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह लागले आहेत. दुसरीकडे विविध रिक्त पदांमुळे शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करताना विद्यापीठ प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.गत आठ महिन्यांपासून हिंदी विभागाचा कारभार सांभाळत आहे. मराठी विभागाचे प्राध्यापक असले तरी हिंदीचे ज्ञान उत्तम आहे. हिंदी विभागप्रमुख पदभरतीबाबत प्रशासनाने आवश्यक बाबी पूर्ण केल्या. मात्र, शासन स्तरावर निर्णय प्रलंबित आहे.- मोना चिमोटे,प्रभारी, हिंदी विभागप्रमुख, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

टॅग्स :educationशैक्षणिक