शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

मराठ्यांचा लढा आत्मसन्मानाचा !

By admin | Updated: September 19, 2016 00:07 IST

शहरामध्ये २२ ला मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.हा मराठ्यांच्या आत्मसन्मानाचा लढा असल्याने ...

शाळांना द्यावी सुटी : आयोजन समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी अमरावती : शहरामध्ये २२ ला मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.हा मराठ्यांच्या आत्मसन्मानाचा लढा असल्याने या मोर्चाच्या निमित्ताने शहरात अभुतपूर्व गर्दी उसळणार आहे. त्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील सर्व खासगी आणि शासकीय शाळा बंद ठेवाव्यात, असा मागणीवजा पत्रव्यवहार सकल मराठ्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आला आहे.सोमवार १९ ला जालना येथे मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी जालना शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.त्याच धर्तीवर अमरावतीमध्येही तीच विनंती करण्यात आली आहे. आयोजन समितीकडूनही शाळांना २२ सप्टेबरला सुटी देण्याची विनंती करण्यात आली आहे. रविवारी येथील गौरी इन मध्ये मोर्चाच्या अनुषंगाने अंतिम नियोजन बैठक घेण्यात आली. मोर्चानिमित्त शहरात येणाऱ्यांची संख्या, त्यासाठी पार्किंग व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, कृत्रिम शौचालये, मोर्चाची वेळ, पाणी व अन्य व्यवस्था याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मोर्चात सुरक्षेसाठी सुमारे २ हजारांहून अधिक स्वंयसेवक तैनात राहणार आहेत. याशिवाय अ‍ॅम्ब्युलन्स आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध राहिल. ५०० पेक्षा अधिक मराठा वकील बांधव ड्रेसकोडमध्ये मोर्चात सहभागी होणार आहेत. दरम्यान मराठा समाजाचे आतापर्यंत निघालेले मूकमोर्चे अत्यंत शांततेत व शिस्तीत निघाले आहेत. त्यामुळे अमरावतीचा मोर्चा याच शिस्तीने निघेल, प्रशासनावर कुठलाही ताण येणार नाही,याचे खबरदारी आपण सामूहिकपणे घेऊ, असे या बैठकीत ठरविले गेले. हा मूक मोर्चा असल्याने कुठलीही घोषणाबाजी होणार नाही, याचे आत्मभान सकल मराठ्यांनी ठेवावे, असे आवाहन करण्यात आले.येथे राहील पार्किंग व्यवस्था गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदान, दसरा मैदान,विधी महाविद्यालयाचे प्रांगण, नरसम्मा महाविद्यालयाचे प्रांगण, सायंस्कोर मैदान,जिल्हा स्टेडियम, धर्मदाय कॉटन फंड, शिवाजी शारिरिक महाविद्यालयाचे प्रांगण, रुरल कॉलेज, विद्याभारती महाविद्यालय, जोग स्टेडियम, येथे पार्किंग व्यवस्था राहणार आहे. आज स्वयंसेवकांची कार्यशाळासोमवारी दुपारी जुन्या बायपासवरील माऊली पॉर्इंट येथे स्वयंसेवकांची कार्यशाळा घेतली जाणार आहे. दोन हजारांच्यावर स्वयंसेवकांना कार्यशाळेदरम्यान सुरक्षा व्यवस्थेचे धडे दिले जाणार आहेत. याशिवाय मोर्चातील त्यांचे स्थान निश्चित केले जाणार आहे.