शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

'त्यांच्या'मुळे वाचला अनेकांचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 23:28 IST

पवित्र बकरी ईदला खुनी रंगात रंगविण्याचा प्रयत्न मोर्शी येथे झाला. क्रबस्थानच्या मशिदीवर बकरी ईदच्या नमाजनंतर आपसी वैमन्यासातून जीवघेणा गोळीबार करण्यात आला होता.

ठळक मुद्देतणावपूर्ण शांतता : पोलिसांच्या प्रसंगावधानाने टळली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : पवित्र बकरी ईदला खुनी रंगात रंगविण्याचा प्रयत्न मोर्शी येथे झाला. क्रबस्थानच्या मशिदीवर बकरी ईदच्या नमाजनंतर आपसी वैमन्यासातून जीवघेणा गोळीबार करण्यात आला होता. मात्र मारेकºयांचा हा प्रयत्न पोलिसांच्या प्रसंगावधनाने टळला, अन्यथा अनेकांचे मुडदे पडले असते.मोर्शी येथे जुण्या वैमन्यस्यातून करण्यात आलेल्या हल्ल्यात सैय्यद नूर सैय्यद मूसा, सैय्यद शकील सैय्यद भुरू, सैय्यद रेहान सैय्यद नूर, सैय्यद रियाज सैय्यद नूर या पिता-पुत्रांवर आबीद खान, हमीद खान, वसीमखान, कलीमखान, नाजीमखान, आरीफखान यांना अटक केली आहे. हे सर्व सहा आरोपी रिव्हॉलव्हर (देशीकट्टा). तलवारी, फरशा ही हत्यारे घेऊन आली होती. नमाज झाल्यानंतर बाहेर पडताना आरोपी आबीदखान याने सैय्यद नूर यांच्यावर गोळ्या झाडल्या, पहिला फ ायर वाया गेला, दुसरी गोळी त्यांच्या कंभरेला लागली तर तिसरी गोळी लागलीच नाही. गोळीचा आवाज होताच या ठिकाणी लोकांमध्ये दहशत निर्माण झाल्याने पळापळ सुरू झाली, तर सैय्यद नूर व त्यांच्या कुटुंबीयांचा खात्मा करण्यासाठी आरोपी सशस्त्र पाठलाग करू लागले. मात्र तेथे खुफिया विभागातील मोहन बारब्धे व वाहतूकचे अरुण साबळे बंदोबस्तात होते. त्यांना हा घटनाक्रम दिसताच त्यांनी वरिष्ठ अधिकाºयांना वायरलेसद्वारे माहिती दिली. नमाजापूर्वी बंदोबस्ताचा आढवा घेण्यास आलेल्या राजू बायस्कर यांनी घटनास्थळ गाठले. पोलीस कर्मचाºयांनी रिवॉल्व्हर घेऊन असलेल्या आबीद खान याला शिताफीने अटक केली. तो गोळी चालविण्याच्या बेतात होता. याचवेळी त्याने पोलिसांच्या तावडीतून पसार होण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. दरम्यान मोर्शी ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त लावला. आरोपींना घेऊन जात असताना मोठी गर्दी जमली होती.व्यावसायिक स्पर्धेतून वाढले वैमनस्यसैय्यद नूर व आरोपी आबीद खान या दोघांचा भंगाराचा व्यवसाय आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा व ग्राहकांना आकर्षित करण्याचा दोघांच्या प्रयत्नातून मोर्शीत खुनी हल्ला झाला. विशेष म्हणजे दोन्ही व्यावसायिक चोरीचा माल विकत घेतात, असा आरोप एकमेकांवर केला जात होता. त्यातून तीन महिन्यांपूर्वी सैय्यद नूर याने अलीम खान याच्यावर जीवघेणा हल्ला के ला होता. अलीम याच्यावर नागपुरात उपचार करण्यात आले, तर याप्रकरणी सैय्यद नूर याच्यावर गुन्हे दाखल करून त्याची कारागृहात रवाणगी करण्यात आली होती.