शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच परमीटवर धावतात अनेक आॅटोरिक्षा

By admin | Updated: August 8, 2016 23:57 IST

प्रादेशिक परिवहन विभागातर्फे देण्यात आलेल्या एका परमीटधारकांना एक आॅटो चालविण्यास परवानगी असते.

सामान्य चालकांच्या व्यवसायावर गदा : छुप्या मार्गाने गॅस रिफिलिंगअमरावती : प्रादेशिक परिवहन विभागातर्फे देण्यात आलेल्या एका परमीटधारकांना एक आॅटो चालविण्यास परवानगी असते. मात्र, शहरातील काही ठिकाणी एकाच नावाच्या परमीटवर अनेक आॅटो चालविण्यात येत असल्याची ओरड काही आॅटो चालकांनी सुरू केली आहे. त्यामुळे परमीटधारक सर्वसाधारण आॅटोचालकांच्या व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली आहे. त्यातच छुप्या मार्गाने शहरातील काही परिसरात गॅस रिफिलिंग होत असल्याची माहिती एका आॅटोचालकांनी दिली. जिल्ह्यात १३ हजार ५०० आॅटोचालक परमीटधारक आहेत. परमीट काढतेवेळी प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमावलीचे पालन करणे आॅटोचालकांना अनिवार्य असते. मात्र, शहरातील काही भागातील आॅटोचालक नियमांची पालमल्ली करीत असल्याचे आढळून येत आहे. आॅटो चालकांना ड्रेसकोड देण्यात आला आहे. मात्र, बहुतांश आॅटोचालक पोशाख परिधान न करताच आॅटो चालवीत आहेत. त्यातच बडनेरा मार्गावर चालणारे चार ते पाच आॅटो एकाच परमीटधारकांचे असल्याचे आढळून आले आहे. सामान्य गोरगरीब आॅटोचालक परमीट घेऊन आॅटो चालवितात. मात्र, धनाढ्य आॅटोचालक एका नावाच्या परमीटवर अनेक आॅटो चालवीत असल्याचे अन्य आॅटोचालकांच्या निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे प्रादेशिक परिवहन विभागाचे परवाना शुल्कदेखील बुडत आहे.हा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, याकडे प्रादेशिक परिवहन विभाग गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. आॅटोचालकाच्या या गोरखधंद्यामुळे सामान्य आॅटोचालकांच्या रोजगारीवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)पाच वर्षांपूर्वी आरटीओकडून झाली कारवाई पाच वर्षांपूर्वी एकाच परमीटवर अनेक आॅटो धावत असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार अशा आॅटोचालकांची यादी तयार करून तब्बल १५० आॅटोचे परमीट रद्द करण्यात आले. मात्र, त्यानंतर या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्यात न आल्याने परिस्थिती जैसे थे झाली आहे. गॅस रिफिलिंगमुळे धोक्याची संभावना शहरातील गोपालनगर व आदर्शनगरात छुप्या मार्गाने गॅस रिफिलिंग होत असल्याची माहिती काही आॅटोचालकांनी दिली. छुप्या मार्गाने होत असलेल्या या गॅस रिफिलिंगमुळे कधीकाळी स्फोट होण्याच्या भीतीने प्रवाशांमध्ये धडकी भरत आहे. याकडे लक्ष देण्यात यावे, अशी मागणी काही आॅटोचालकांनी केली आहे. काही वर्षांपूर्वी अशा परमीटधारक आॅटोवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर हा प्रकार आढळून आला नाही. अशा आॅटोचे क्रमांक व तक्रार आल्यास कारवाई करू. - श्रीपाद वाडेकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी.