मोर्चेबांधणी : २९ आॅक्टोबरला निवडसुमित हरकूट चांदूरबाजारयेथे नगराध्यक्षपदासाठी २९ आॅक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. याकरिता पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी सुरू आहे. नगरपालिकेवर प्रहारचे बहुमत असताना नगराध्यक्षपदी मनीषा नांगलिया यांची अखेरच्या क्षणी वर्णी लागणार, अशी चर्चा सर्वत्र होत आहे.नगरपालिकेच्या ५ वर्षांच्या कार्यकाळातील अखेरचे एक वर्ष शिल्लक आहे. या पंचवार्षिकमध्ये प्रहारच्या सरोज हरणे यांनी अडीच वर्षे तर शुभांगी देशमुख यांनी १४ महिने नगराध्यक्षपद भूषविले. मात्र आता १४ महिनेच कार्यकाळ शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या कार्यकाळात नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे अद्याप निश्चित झाले नसले तरी यापदाकरिता मनीषा नांगलिया, सुनीता गणवीर हे संभाव्य उमेदवार आहेत. पालिकेत प्रहारचे १० सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, काँग्रेसचे १, भाजपा-१ तर अपक्ष १ असे १७ सदस्य संख्या आहे. आमदार बच्चू कडू यांचा ‘पूर्ण सत्ता पूर्ण विकास’ या मागणीला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत बहुमत प्राप्त करून दिले. पालिकेत सुरुवातीचे २ वर्षे अतिशय शांततेत तर विकासकामांत गेले. तत्कालीन नगराध्यक्ष सरोज हरणे यांनी पालिकेची तिजोरी भरण्याकरिता कर वसुली, सौंदर्यीकरण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन वितरित केले. विकासकामे रखडलीचांदूरबाजार : प्रहारचे सदस्य प्रहारच्या सत्तेविरुध्द उपोषणावर बसू लागले. त्यामुळे विकासाची कामे रखडली. प्रहारच्या देशमुख यांनी सूत्रे हाती घेतल्यावर विकासकामांपेक्षा तक्रारींचा ढीग पालिकेत वाढू लागल्याने त्यांनी अखेर १४ महिन्यांत पदाचा राजीनामा दिला. दरम्यान नगराध्यक्षकरिता अर्जाची उचल २६ आॅक्टोबर रोजी करता येईल. तसेच नामांकन होणार आहे. तसेच २७ आक्टोबर रोजी नामांकन अर्ज परत घेता येणार असून २९ आॅक्टोबरला नवीन नगराध्यक्षाची वर्णी लागणार आहे. अखेरच्या १४ महिन्यांच्या कालावधीत जनतेला विकास म्हणजे काय? हे प्रहारच्या नगराध्यक्षाला आता दाखविणे आवश्यक आहे. त्यामुळे नव्या नगराध्यक्षांना विकासकामे वेळेत करवून घेण्याचे मोठे आव्हान आहे.
चांदूरच्या नगराध्यक्षपदी मनीषा नांगलिया?
By admin | Updated: October 25, 2015 00:08 IST