शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

आंब्याची झाडे करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 22:48 IST

नजीकच्या शहापूर येथे महावितरण कंपनीच्या वाहिनीच्या जिवंत तारांत घर्षण झाल्याने आगीचे लोळ पडून आंब्याची दोनशे लहान झाडे करपली,....

ठळक मुद्देशहापूर येथील घटना : महावितरणचा बेजबाबदारपणा

आॅनलाईन लोकमतचिखलदरा : नजीकच्या शहापूर येथे महावितरण कंपनीच्या वाहिनीच्या जिवंत तारांत घर्षण झाल्याने आगीचे लोळ पडून आंब्याची दोनशे लहान झाडे करपली, तर दीड लाख रुपयांचे गवत जळाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.तालुक्यातील शहापूर येथील माजी सरपंच हिरुजी हेकडे यांनी त्यांच्या शेतात गुरांच्या चाऱ्यासाठी गवत वाढविले आहे. तेथेच दोनशे आंब्याची झाडे लावली आहेत. त्यांच्या शेतातून गेलेल्या महावितरणच्या वीज वाहिनीत घर्षण होऊन आगीचे लोळ गवतावर पडले. गवताला लागलेली आग पसरत गेली व यात दोनशे आंब्याची लहान झाडे करपली. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रदीप पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. तलाठ्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.तारांमध्ये घर्षण होत असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे याची दुरूस्ती करावी, अशी विनंती नागरिकांनी केली होती. मात्र, त्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. यासोबतच बेजबाबदारीने उत्तर देत उद्धट वागणूक दिल्याचा आरोप पीडित शेतकरी हेकडे यांनी केला आहे. या घटनेची माहिती दिल्यावर त्यांनादेखील पुन्हा तसाच अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले.मोठा अनर्थ टळलामंगळवारी हेकडे यांच्या शेतात खांबावरून आगीचे गोळे पडल्याने गुरांसाठी पेरलेल्या गवताने पेट घेत पाच एकर शेत कवेत घेतले परिसरात हवेचा वेग अधिक असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. शेत गावशिवारावर असल्याने आग पसरत गावाच्या दिशेने येत होती गांवकऱ्यांना सदर प्रकार दिसताच त्यांनी विरुद्ध दिशेने गवतावर पाणी ओतले परिणामी आग विझली.पाच एकर शेतातील गुरांसाठी असलेला चारा पूर्णत: जळून राख झाला. त्याची झळ दोनशे आंब्याच्या झाडाला बसून मोठे नुकसान झाले विद्युत वितरणाच्या अधिकाºयांनी सतत दुर्लक्ष केले, त्यांच्यावर कारवाही व्हावी.- हिरुजी हेकडे, शेतकरी शहापूर