शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आंबियाची ५४ हजार हेक्टरमध्ये गळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:52 IST

यंदाच्या हंगामात बऱ्यापैकी असलेल्या संत्र्याच्या आंबिया बहराची रसशोषक किडींचा प्रादुभार्व, बुरशीजन्य रोग व वातावरणातील बदलामुळे फळगळ झाली. यामध्ये उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी डिसेंबरमध्ये पंचनाम्याचे आदेश दिलेत.

ठळक मुद्दे६० हजार संत्रा उत्पादकांचे नुकसान : ३८ हजार हेक्टर मदतीस पात्र, शासनाला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या हंगामात बऱ्यापैकी असलेल्या संत्र्याच्या आंबिया बहराची रसशोषक किडींचा प्रादुभार्व, बुरशीजन्य रोग व वातावरणातील बदलामुळे फळगळ झाली. यामध्ये उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी डिसेंबरमध्ये पंचनाम्याचे आदेश दिलेत. यामध्ये जिल्ह्यातील ५३ हजार ३९२ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. यापैकी ३३ टक्क्यांवर नुकसान असलेल्या ३८ हजार १४१.७७ हेक्टरमध्ये नैसर्गिक आपत्तीची मदत मिळण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात साधारणत: संत्र्याचा आंबिया बहर घेतला जातो. परंतु, यावर्षी आॅगस्ट महिन्यात वातावरण बदलासह किडीमुळे संत्र्याच्या आंबिया बहराची फळगळ मोठ्या प्रमाणात झाली. याविषयी शेतकऱ्यांच्या सातत्याने तक्रारी झाल्यात, शेतकºयांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीसाठी शेतकºयांना मदत व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ७ डिसेंबरला संयुक्त पंचनाम्याचे आदेश दिलेत. यामध्ये जिल्ह्यातील ११३६ गावांमधील ५९ हजार ९५६ शेतकºयांच्या ५३ हजार ६१२ हेक्टरमधील आंबिया बहराचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. हा अहवाल शासनाला सादर झाला. या बाधित शेतकऱ्यांना शासन मदतीची प्रतीक्षा आहे.यंदा आॅगस्ट व सप्टेंबर या कालावधीत वातावरणात दिवसा उष्णतामान अधिक होते. वातावरणातील बदलासह अन्नधान्याची कमतरता व बुरसीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानेही आंबियाची प्रचंड फळगळ झाली. बोटिओडीप्लोडीया, किलीटोट्रिकम व काही प्रमाणात आॅल्टर नेरिया या बुरसीमुळेही संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. या बुरशी देठाद्वारे फळात प्रवेश करून नुकसान करतात. जुन्या वाळलेल्या फांद्या असतील तर रोग अधिक पसरतो. काळी माशी, मावा तुडतुडे, यांच्या शरीरातून निघालेल्या साखरेसारख्या पदार्थावर बुरशीची वाढ होते व पेशीक्षय होऊन फळगळ झाली. संत्र्यांमध्ये शेंडेमर रोगाला कारणीभूत असलेल्या बुरसीचा प्रादुर्भाव पावसाळ्यात होतो. मात्र, याची लक्षणे सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात दिसून आलीत. या बुरशीचा प्रादुर्भाव संत्र्याचे देठ व सालीच्या जोडावर होऊन तेथे काळपट व तपकिरी रंगाचे डाग पडलेत व तो भाग कुजून फळांची गळती झाली.रसशोषक किडीमुळेही फळगळसंत्र्याची फळे पक्वहोण्याच्या काळात रसशोषक किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. हे पंतग संध्याकाळच्या वेळी अर्धकच्ची फळात छिद्र करून रस शोषण करतात. या छिद्रातून रोगजंतूचा शिरकाव होऊन फळे पिवळी पडतात व छिद्रातून रोगजंतूचा शिरकाव होऊन याच छिद्रापासून फळे सडण्यास सुरूवात होते. परिणामी कीडग्रस्त फळे गळून पडतात. मृगबहराच्या तुलनेत आंबिया बहाराच्या फळांवर म्हणजेच सप्टेंबर व आॅक्टोबर या कालावधीत या किडीचा जास्त प्रादुर्भाव दिसून आला.