शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

कसबा हुक्का पार्लरवर धाड संचालकासह मॅनेजर अटकेत

By admin | Updated: June 23, 2017 00:12 IST

हुक्का पार्लर बंदचे आदेश असतानाही शहरात हुक्का पार्लर सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.

विद्यापीठ ते तपोवन मार्गावरील घटना : बजरंग दलाच्या पुढाकाराने कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हुक्का पार्लर बंदचे आदेश असतानाही शहरात हुक्का पार्लर सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. दोन दिवसांपूर्वीच गुन्हे शाखेच्या पथकाने कठोरा मार्गावरील काफिला हुक्का पार्लरवर कारवाईचा बडगा उगारला. गुरुवारी रात्री गाडगेनगर पोलिसांनी कस्बा हुक्का पार्लरवर धाड टाकली. गाडगेनगर पोलिसांनी आरोपी संचालक गौरव खंडेलवाल व मॅनेजर तिवारी या दोघांना अटक केली आहे. या हुक्का पार्लरमधून पोलिसांनी २२ हुक्का पट व अन्य फ्लेवरचे डब्बे जप्त केले. बसस्थानक ते रेल्वेस्थानक मार्गावरील अड्डा-२७ मध्ये हुक्का पार्लर व डॉन्स पार्लर सुरू असल्याचे सर्वप्रथम बजरंग दलाला आढळून आले होते. त्याअनुषंगाने पोलिसांनी अड्डा-२७ ची झडती घेतली होती. हुक्का पार्लर संस्कृतीत अमरावती रुजू होत असल्याचे पाहून बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. हुक्का पार्लर संस्कृती बंद करावी, यासाठी बजरंग दलाने प्रशासनास वेठीस धरले होते. सहायक कामगार आयुक्त कार्यालयात ठिय्या देऊन हुक्का पार्लरचालकाविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीही रेटून धरली होती. त्याअनुषंगाने सहायक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत शहरातील चार हुक्का पार्लरची नोंदणी रद्द करण्यात आली आणि अड्डा-२७ व कसबा कॅफेची नोंदणी रद्द करून नोंदणीधारकाविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांनी हुक्का पार्लर बंदचे फर्मान सोडले होते. त्यामुळे काही दिवस शहरात हुक्का पार्लर बंद असल्याचेही आढळून आले. मात्र, दोन दिवसांपूर्वीच कठोरा मार्गावरील काफिला कॅफे अ‍ॅन्ड रेस्टांरटमधील हुक्का पार्लरचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. संचालकासह एकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली होती. मात्र, गुरुवारी विद्यापीठ ते तपोवन मार्गावरील कसबा कॅफेमध्ये हुक्का पार्लरवर धाड टाकल्यानंतर शहरात हुक्का पार्लर छुप्या मार्गाने सुरूच असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हुक्का पार्लर चालविणाऱ्यांना पोलिसांचेसुध्दा अभय असल्याचे आढळून आले आहे. व्हेंटिलेटर, खिडकीसुद्धा नाहीगाडगेनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्यासह अन्य पोलिसांनी कस्बा हुक्का पार्लरवर धाड टाकली. पोलिसांनी हुक्का पार्लरच्या जागेची पाहणी केली असता त्या ठिकाणी हवा जाण्यासाठी मार्गच नसल्याचे आढळून आले. खिडकी नाही व व्हेंटिलेटरची सोयच नसल्याचे दिसून आले. दम-मारो दम करणारी तरुणाई हुक्का फ्लेवरच्या धुरामध्ये गुरफटलेले पोलिसांना आढळून आले. हुक्क्यात तंबाखुजन्य पदार्थ असून त्यातून निघाणाऱ्या धुराचा आरोग्यावर घातक परिणाम होते. मात्र, हुक्का पार्लर चालविणाऱ्या संचालकांनी ग्राहकाच्या आरोग्याशी खेळच सुरु ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. बजरंग दलाने केला पर्दाफाशशहरातून हुक्का पार्लर संस्कृती हद्दपार करण्यासाठी बजरंग दलाचे कार्यकर्ता सातत्याने प्रयत्न करीत आहेत. कसबा कॅफेमध्ये हुक्का पार्लर सुरुअसल्याची भनक पदाधिकाऱ्यांना लागली होती. त्या अनुषंगाने बजरंग दलाचे प्रवीण गिरी, निरंजन दुबे, बिपीन गुप्ता, अमोल चौधरी, राजू दुबे, पवन श्रीवास, सुमित साहू, ड्युक्स गोधवानी, नितांशू इटोरिया, सिध्दु सोळंकी, दुर्गेश ठाकुर, त्रिदेव डेंडवाल, शिवम बिंडा, अमन धनवानी, विजू खडसे, बंटी पारवानी आदी कार्यकर्त्यांनी कस्बावर गुरुवारी रात्री धाड टाकली. त्यावेळी संचालकासह तेथील हुक्का दम लावणाऱ्या ग्राहकांची ताराबंळ उडाली. दरम्यान पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली.