अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांच्या संलग्नीकरणाचा मुद्दा ऐरणीवर
आला आहे. आतापर्यंत ११ महाविद्यालयांनी ना बंदचा प्रस्ताव, ना संलग्नीकरण केले. त्यामुळे अधिष्ठाता
मंडळांनी अशा कॉलेज संचालकांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागविले. मात्र, या नोटीसला कॉलेजने
उत्तरही दिले नाही. त्यामुळे डीन मंडळाला कॉलेजने व्यवस्थापन जुमानत नसल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ कलम १२० नुसार महाविद्यालयांच्या संलग्नीकरणाबाबत अध्यक्ष, सचिवांना २३ मे २०१९ रोजी नोंदणीकृत डाकेने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसवर स्पष्टीकरण सादर करण्यास एक महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. परंतु, महिन्याभराच्या कालावधीत कॉलेज संचालकांकडून अधिष्ठाताच्या नोटीसला उत्तर पाठविले नव्हते. परिणामी ३ ऑगस्ट २०२९ रोजी झालेल्या अधिष्ठातांच्या सभेत विषय क्रमांक ६८ अन्वये हा विषय विचारार्थ ठेवण्यात आला. थेट संलग्नीकरण काढून घेण्याविषयी मंथन झाले. मात्र, ४ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत कॉलेजचे संलग्नीकरण काढून न घेता संबंधित कॉलेजचे अध्यक्ष, सचिवांना एक संधी देण्याचा निर्णय घेण्या आला. त्यामुळे तूर्तास ११ कॉलेजचे संलग्नीकरण थांबले आहे.
--------------------
कोट
संलग्नीकरण नसलेली एकूण १३ महाविद्यालये आढळून आली. त्यापैकी दाेन कॉलेज संचालकांकडून बंद करण्याबाबतचे प्रस्ताव मिळाले. संलग्नीकरण नसलेल्या ११ कॉलेजचे अध्यक्ष, सचिवांना नोटीस पाठविली होती. मात्र, विद्या परिषदेने एक संधी देण्याबाबत निर्णय घेतला. त्यामुळे अशा कॉलेजविरुद्ध कारवाई टळली.
- एफ.सी. रघुवंशी, अधिष्ठाता. अमरावती विद्यापीठ.