शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पोळा उत्सवात ‘मामा-भांजा’ अव्वल

By admin | Updated: September 2, 2016 00:14 IST

श्री. शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा आयोजित जनता कृषि तंत्र विद्यालयालयाच्या संयोजनात गुरुवारी पोळा उत्सव साजरा झाला

शिवाजी संस्थेचा उपक्रम : शेतकऱ्यांचा सहभाग अमरावती : श्री. शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा आयोजित जनता कृषि तंत्र विद्यालयालयाच्या संयोजनात गुरुवारी पोळा उत्सव साजरा झाला या पोळा उत्सवात बैल सजावट स्पर्धेत रहाटगाव येथील मामा- भांजा बैल जोडी अव्वल ठरली.स्थानिक रुरल इंन्स्टिट्युटच्या प्रांगणात झालेल्या पोळा उत्सवात ९ शेतकऱ्यांच्या बैलजोडीने हजेरी लावली होती. बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश ठाकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारिणी सदस्य एम. के. नाना देशमुख, अरविंद मंगळे, प्राचार्य नंदकिशोर चिखले, उद्धवराव चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते पोळ्यामध्ये उत्कृष्ट व सजवून आणलेल्या बैलजोड्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रथम पुरस्कार रहाटगाव येथील मामा- भांजा या बैल जोडीला स्व. रामराव मोहोड स्मृती प्रित्यर्थ धनंजय मोहोड यांच्या तर्फे शिल्ड, अहेर व बैलाचा साज तर जनता कृषि महाविद्यालाचे माजी प्राचार्य पी. व्ही. यावलीकर यांचे तर्फे १००१ रुपये प्रदान करण्यात आले. स्व. एन. जे. बापू देशमुख स्मृती प्रित्यर्थ विजय देशमुख यांच्याकडून १००१ रुपये, स्व. वामनराव काळे स्मृती प्रित्यर्थ विलास काळे यांच्याकडून रोख १००१ रुपये तसेच मधुकरराव अर्डक स्मती प्रित्यर्थ निलिमा ठाकरे यांच्यातर्फे ५०१ रुपये बक्षीस प्रदान करण्यात आले. द्वितीय पुरस्कार येथील सचिन सातोकर यांच्या बैलजोडीने पटकाविला. राजाभाऊ उंबरकर यांच्याकडून शिल्ड, अहेर, बैलाचा साज तर अरविंद ठाकरे व विनोद भुंबर यांच्याकडून प्रत्येकी १००१ रुपये, बबनराव देशमुख यांच्याकडून रोख ५०१ रुपये प्रदान करण्यात आले. तृतीत बक्षीस शिवाजी कृषि महाविद्यालयाच्या बैलजोडीने पटकाविले. या जोडीला रुरल इंन्स्टिट्युटचे प्राचार्यतर्फे ११११ रुपये तर शैलेश दांडगे यांच्यातर्फे ५०१ रुपये बक्षईस प्रदान करण्यात आले. चौथे क्रमांकाचे बक्षीस जनता कृषि महाविद्यालयाच्या बैलजोडीने मिळविला.(प्रतिनिधी)