शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

‘मालू है कि मानते नहीं!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:05 IST

आयुक्त हेमंत पवार यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेली नोटीस अव्हेरून मालू इन्फ्रास्पेसने बेकायदेशीर युनिपोलवर ‘स्व’जाहिराती झळकवल्या आहेत.

ठळक मुद्देआयुक्तांना ठेंगा : बेकायदेशीर युनिपोलवर जाहिराती

आॅनलाईन लोकमतअमरावती : आयुक्त हेमंत पवार यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेली नोटीस अव्हेरून मालू इन्फ्रास्पेसने बेकायदेशीर युनिपोलवर ‘स्व’जाहिराती झळकवल्या आहेत. मालू इन्फ्रास्पेसच्या या उद्दामपणावर प्रशासनाने मौन धारण केले आहे. ‘मालू है कि मानता नहीं’ अशी हतबलतेची प्रतिक्रिया महापालिका प्रशासनाने दिली आहे.हेमंत पवार यांच्याशी झालेल्या बेकायदेशीर करारनाम्याचा हवाला देत मालू इन्फ्रास्पेसने गर्ल्स हायस्कूल ते इर्विन रस्त्याच्या दुभाजकावर पाच युनिपोल उभारलेत. पवारांनी हा दुभाजक १० वर्षांसाठी मालूंना ‘गिफ्ट’ दिला आहे. ‘गर्ल्स हायस्कूल ते इर्विन दुभाजक विकले’ या वृत्तातून ‘लोकमत’ने त्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर अनधिकृत युनिपोल हटवावेत, अन्यथा आम्ही हटवू, अशी नोटीस ११ डिसेंबर रोजी महापालिकेने दिली.न्यायालयाची अवहेलनामालू इन्फ्रास्पेसला तीन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. तथापि, चुकीच्या जागेवर उभारलेले जाहिरातीसाठीचे युनिपोल न हटविता, मालू इन्फ्रास्पेसने थेट आयुक्तांवर शरसंधान केले. नोटीस मागे घ्या, अन्यथा १ सप्टेंबर २०१६ रोजीच्या करारनाम्याच्या उल्लंघनाचे दोषी म्हणून आपण पात्र व जबाबदार राहाल, असे उलटपक्षी कळविण्यात आले.‘लोकमत’च्या सततच्या पाठपुराव्याने आयुक्तांनी मालू इन्फ्रास्पेसशी करण्यात आलेला करारनामा अनधिकृत ठरविला. कळस म्हणजे, २६ जानेवारीपासून त्या पाचही युनिपोलवर स्वत:च्या मालकीच्या मार्केटमध्ये असलेल्या प्रतिष्ठानांची जाहिरात फलके मालू इन्फ्रास्पेसने लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची राजरोस अवहेलना होत असताना मालूंसमोर महापालिकेने कच खाल्ली आहे.प्रशासन ताटाखालचे मांजरमहापालिका मालू इन्फ्रास्पेसच्या ताटाखालचे मांजर आहे की काय, अशी शंका घेण्याइतपत प्रशासनाने या प्रकरणात ‘कचखाऊ’ वृत्तीचे दर्शन घडविले आहे. यात थेट आयुक्तांचा संबंध असल्याने कनिष्ठ अधिकाºयांनी, कर्मचाºयांनी बोलावे तरी काय, अशी उलटपक्षी विचारणा होत आहे.किती हा उद्दामपणा!आपण ही नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत अनधिकृत जाहिरात पोल हटवावेत, अशी नोटीस ११ डिसेंबरला देण्यात आली होती. पोचमार्गाच्या विरामरेषेपासून २५ मीटर अंतरामध्ये रस्त्याच्या बाजूने कोणतीही जाहिरात लावण्यास परवानगी देता येत नाही, असे बजावण्यात आले होते. त्या नोटीसच्या प्रत्युत्तरात नोटीस पाठवत आणि आता चक्क त्या बेकायदेशीर युनिपोलवर जाहिराती लावून मालू इन्फ्रास्पेसने उद्दामपणा प्रदर्शित केला आहे.