शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील बँका आॅनलाईन करा

By admin | Updated: June 12, 2017 00:13 IST

शहरी बँकांप्रमाणे ग्रामीण भागातील बँका आॅनलाइन करून शेतकऱ्यांची परवड थांबविण्याची मागणी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

वित्तमंत्र्यांना निवेदन : शेतकऱ्यांची परवड थांबविण्याची मागणीपरतवाडा : शहरी बँकांप्रमाणे ग्रामीण भागातील बँका आॅनलाइन करून शेतकऱ्यांची परवड थांबविण्याची मागणी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाच्या माध्यामातून करण्यात आली आहे. शेतमाल विक्रीनंतर व्यापारी शेतकऱ्यांना धनादेश देतात. तो धनादेश ग्रामीण बँकांमध्ये दिल्यानंतर क्लियरन्ससाठी किमान १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. शेतकऱ्यांना बँकेच्या चकरा माराव्या लागतात. दुसरीकडे आर्थिक कोंडीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. या समस्या पाहता ‘डिजिटल इंडिया’ अंतर्गत बँकेच्या ग्राहकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी बँका आॅनलाइन करण्याची मागणी भाजपचे अचलपूर तालुकाध्यक्ष सुधीर रसे यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली आहे. यासंदर्भातील एक निवेदन त्यांनी ना.सुधीर मुनगंटीवार हे अमरावती जिल्हा दौऱ्यावर असताना दिले. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी हे उपस्थित होते. ग्राहकांनी मिळवली आॅनलाईन बँकिंगची माहिती परतवाडा : देशात सर्वत्र कॅशलेस व्यवहाराला प्रारंभ झालेला आहे. त्याअनुषंगाने नजीकच्या परसापूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत आर्थिक साक्षरता सप्ताह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर टेहरे, प्रमुख अतिथी पांडे मामा, पुरुषोत्तम घोरमाडे उपस्थित होते. संचालन विनोद भुसाटे यांनी केले. हा कार्यक्रम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परसापूर शाखेच्यावतीने भारतीय रिझर्व बँक व नाबार्ड पुरस्कृत आर्थिक साक्षरता समुपदेशन सप्ताहांतर्गत घेण्यात आला.